Homeताज्या बातम्यानवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ८ लाख १३ हजार किंमतींचे...

नवी मुंबई कामोठे शहर पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी ८ लाख १३ हजार किंमतींचे ५० मोबाईल मिळवण्यात पोलिसांना यश

नवी मुंबई,दि,१५.( प्रतिनिधी)

कामोठे पोलीस ठाण्याने तांत्रिक तपासाच्या माध्यमातून हरवलेले व चोरीस गेलेले जवळपास ५० मोबाईल फोन शोधून काढले आहेत. मोबाईलचा शोध (सी.ई.आय.आर)(सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर) या केंद्र शासनाच्या पोर्टलचा तसेच तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून सदर मुद्देमाल मिळविण्यात आला. ट्रेस झालेल्या मोबाईलमध्ये वापरण्यात येत असलेल्या मोबाईल क्रमांकांच्या आधारे संबंधित व्यक्तींचा शोध घेऊन, मोबाईल जप्त करण्यात आले.

तपासादरम्यान महाराष्ट्रातील संभाजीनगर, पुणे, नाशिक, अमरावती आदी ठिकाणांहून काही मोबाईल कुरिअरद्वारे मागवून घेण्यात आले. तपासात असे आढळून आले की, चोरी झाल्यानंतर मूळ चोरटे हे मोबाईल कोणतेही बिल न देता विविध कारणे सांगून सामान्य नागरिकांना विक्री करत असत. त्यामुळे मूळ चोरट्यांपर्यंत पोहोचणे अनेकदा कठीण ठरते. सन २०२५ व २०२६ मधील उपलब्ध झालेले काही मोबाईल संबंधित फिर्यादींना परत देण्यात येत आहेत. परत करण्यात येणाऱ्या मोबाईलची एकूण अंदाजे किंमत रु. ८ लाख १३ हजार किंमतीचे आहेत. (सी.ई.आय.आर) हे केंद्र शासनाचे प्रभावी पोर्टल असून, मोबाईल हरवल्यास किंवा चोरीस गेल्यास तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून (सी.ई.आय.आर) पोर्टलवर नोंदणी करावी, असे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. सदर तपास मा. पोलिस उपायुक्त श्रीमती रश्मी नांदेड़कर, मा. साहयक पोलिस आयुक्त श्री. विक्रम कदम साहेब, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सौ. ज्योती देशमुख मॅडम तसेच पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. मनोहर पगार व पो. उपनिरीक्षक प्रतापसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस शिपाई श्री. राजेंद्र इलग यांनी यशस्वीरित्या पूर्ण केला. कामोठे शहर पोलिसांच्या या उत्कृष्ट कामगिरीचे नागरिकांनी व फिर्यादींनी कौतुक केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!