Homeताज्या बातम्याकोपरगावात गटाराच्या कामात 'धातुरमातुर'; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी करावी; संजय लाड यांची मागणी

कोपरगाव : दिलीप गायकवाड

कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे काम करून केवळ बिले उकळण्याचा प्रकार सुरू असून, यामागे संबंधित ठेकेदार व स्थानिक लोकप्रतिनिधींचे संगनमत असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी केला आहे.

नगरसेवक  यांच्या प्रभागात सुरू असलेल्या  ठेकेदार यांच्या अंतर्गत हे काम सुरू असलेल्या या कामात सराफ बाजारातील अरुण बागुल ज्वेलर्ससमोरील जुने गटार अरुंद करून नूतनीकरण केले जात असल्याबाबत नागरिकांनी आक्षेप नोंदवला आहे. पहिल्याच पावसात या परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. असे असतानाही पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कोणतीही प्रभावी उपाययोजना न करता केवळ उथळ खोदकाम करून नळ्या टाकल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

नागरिकांनी विरोध करूनही चिखलातच नळ्या दाबण्यात आल्या असून, सध्या गटार चेंबर व काँक्रीटचे ठापे टाकून धातुरमातुर काम सुरू असल्याचे लाड यांनी सांगितले. हे बांधकाम मोठ्या पावसात टिकणार नसून भविष्यात अपघात होण्याचीही शक्यता नाकारता येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

या कामाबाबत ठेकेदार व संबंधितांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे न देता उद्धटपणाची भाषा वापरण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला आहे. गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेल्या या कामामुळे व्यापारी, वाहनचालक आणि पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

कोपरगाव नगरपरिषदेचे मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन कामाच्या गुणवत्तेची चौकशी करावी, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि दोषींना जबाबदार धरावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!