Homeताज्या बातम्याठाणे , अंबिकानगरात वर्षावास प्रवचनमालेचा शुभारंभ; भगवान बुद्धांच्या धम्मावर सुप्रियाताई कासारे यांचे...

ठाणे , अंबिकानगरात वर्षावास प्रवचनमालेचा शुभारंभ; भगवान बुद्धांच्या धम्मावर सुप्रियाताई कासारे यांचे प्रभावी मार्गदर्शन

ठाणे, दि.३०.( अजय मगरे )

आषाढ पौर्णिमा व गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, ठाणे महानगर जिल्हा अंतर्गत अंबिका नगर-२ शाखेच्या वतीने वर्षावास प्रवचनमाला २०२६ चा उत्साहपूर्ण शुभारंभ करण्यात आला. शाखाध्यक्ष सुशांत साबळे गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय प्रशिक्षण विभागाच्या प्रमुख आदरणीय सुप्रियाताई कासारे यांनी “विश्वगुरू तथागत भगवान बुद्ध” या विषयावर अत्यंत अभ्यासपूर्ण, विचारप्रवर्तक आणि प्रभावी प्रवचन देत उपस्थितांना धम्माचा संदेश दिला.

कार्यक्रमानिमित्त विश्वरत्न मित्र मंडळाच्या वतीने उपस्थित धम्म उपासक-उपासिकांना खीरदान करण्यात आले. तसेच ठाणे महानगर जिल्हा शाखेचे पर्यटन सचिव नामदेव झिने गुरुजी यांनी वर्षावास प्रवचनमालेसाठी ५ हजारांचे धम्मदान जाहीर करून सामाजिक बांधिलकीचा आदर्श ठेवला. ही रक्कम शाखेचे कोषाध्यक्ष पप्पू गायकवाड यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली.

यावेळी ठाणे महानगर जिल्ह्याचे उपाध्यक्ष वसंत मोरे गुरुजी, ज्येष्ठ नेते सुखदेव उबाळे, महिला उपाध्यक्षा शोभाताई काळे, जिल्हा सचिव एल. आर. मोरे गुरुजी, वंचित बहुजन आघाडीच्या उपाध्यक्षा छायाताई बच्चुटे, आरपीआय ठाणे जिल्हा अध्यक्षा विमलताई सातपुते, महिला सचिव शांताबाई आठवले, नंदाताई सोनवणे यांच्यासह विभागातील मोठ्या संख्येने धम्म उपासक-उपासिका उपस्थित होते. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याने अंबिका नगर परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

error: Content is protected !!