Homeताज्या बातम्यापुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे

पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२ सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडतीची ऑनलाइन अर्ज नोंदणी सोमवारी (२४ ऑगस्ट) दुपारी १२ वाजता सुरू झाली. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर २०२६ रोजी रात्री ११.५९ वाजेपर्यंत आहे.

१५ टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प व अल्प उत्पन्न गटासाठी मांजरी खुर्द, म्हाळुंगे आणि भूगाव येथील सदनिका उपलब्ध आहेत. तर २० टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत पुणे महापालिका हद्दीतील धानोरी, वारजे, कात्रज, हडपसर, पाषाण, खराडी, बाणेर, धायरी, लोहगाव, बिबवेवाडी, मुंढवा, उंड्री, वडगाव, बावधन आणि कोंढवा खुर्द आदी भागांतील सदनिकांचा समावेश आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीत मोशी, किवळे, डुडूळगाव, ताथवडे, वाकड, चिखली, रावेत, पुनावळे, बालेवाडी, रहाटणी, वडमुखवाडी, मानुर्डी, पिंपळे सौदागर आणि पिंपळे गुरव आदी परिसरातील सदनिका सोडतीसाठी उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

१६ सप्टेंबरपर्यंत अनामत रक्कम भरण्याची संधी

नोंदणीकृत अर्जदारांना १५ सप्टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येईल. त्याच दिवशी रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अनामत रक्कम स्वीकारली जाणार आहे. RTGS/NEFTद्वारे अनामत रक्कम भरण्यासाठी १६ सप्टेंबर रोजी संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत मुदत देण्यात आली आहे.

स्वीकृत अर्जांची प्रारूप यादी २९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध होईल. यावर हरकती व दावे नोंदविण्यासाठी १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत आहे. अंतिम यादी ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता प्रसिद्ध केली जाणार असून, संगणकीय सोडत १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे.

उत्पन्नाची मर्यादा निश्चित

अत्यल्प उत्पन्न गटासाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाची मर्यादा ६ लाख रुपये, तर अल्प उत्पन्न गटासाठी ९ लाख रुपये आहे. उत्पन्नाचा पुरावा १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीशी संबंधित असणे आवश्यक आहे. यासाठी आयकर विवरणपत्र किंवा तहसीलदारांचा दाखला ग्राह्य धरला जाणार आहे. पती-पत्नीचे एकत्रित उत्पन्न विचारात घेतले जाणार आहे.

अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी म्हाडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती पुस्तिका, पात्रता निकष, अटी-शर्ती आणि संबंधित योजनांची माहिती काळजीपूर्वक वाचावी, असे आवाहन पुणे मंडळाने केले आहे. ऑनलाइन अर्जासाठी housing.mhada.gov.in किंवा mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळांचा वापर करावा. अधिक माहितीसाठी पुणे मंडळाच्या सोडत मदत केंद्राशी ०२२-६९४६८१०० या क्रमांकावर संपर्क साधता येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार;

पुणे रिंगरोडच्या विस्तारीकरणाने वाहतूक कोंडी सुटणार — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : अजय मगरे मुंबई महानगर प्रदेशातील वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणाऱ्या मेट्रो-१३ (मीरा भाईंदर–वसई-विरार) प्रकल्पाला...

सर्पदंश ‘अधिसूचित आजार’; उपचार व्यवस्था अधिक सक्षम करणार – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई : अजय मगरे राज्यात सर्पदंशाच्या घटनांमुळे होणारे मृत्यू आणि अपंगत्व रोखण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्पदंशाला ‘अधिसूचित आजार’ म्हणून घोषित करण्यात...

युरिया-डीएपीचे लिंकिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा!

कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांचा अधिकाऱ्यांना सज्जड इशारा; शेतकऱ्यांच्या तक्रारींची तातडीने दखल घेण्याचे निर्देश मुंबई : अजय मगरे खते खरेदी करताना शेतकऱ्यांना युरिया, डीएपीसोबत इतर रासायनिक...

error: Content is protected !!