मुंबई,दि.४ : मंगेश म्हात्रे
कॉम्रेड शैलेंद्र कांबळे हे गेले ४५ वर्षे अंधेरी मरोळनाकासह संपूर्ण मुंबई त्याचबरोबर महाराष्ट्र आणि राष्ट्रीय पातलीवर सामाजिक आणि राजकीय कार्य करत आहेत. कामगार कष्टकऱ्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी ते मुंबई महानगरपालिकेच्या ८६ क्रमांकाच्या वार्डमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शैलेंद्र कांबळे निवडणूक मैदानात उतरल्याने विरोधकांसमोर जोरदार आव्हान निर्माण झाले आहे.
मरोळ नाका ते सहार विभागातील एअरपोर्ट आणि त्याच्या जमीनी आदानी च्या स्वाधीन केल्या आहे . मात्र आदानी स्थानिक नागरिकांचे नुकसान करत असल्याचा आरोप कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी केला आहे. कॉमरेड शैलेन्द्र हे सेंटर ऑफ इंडियन ट्रेड यूनियन मार्फ़त फेरीवाला, बांधकाम-नाका कामगार, पालिका कामगार यांची युनियन्स चालवतात. मरोळ नाका अंधेरी येथील झोपडपट्टी आणि नागरिकांच्या प्रश्नावर ते अनेक वर्षे काम करीत आहेत. त्यांच्या पुढाकाराने २००२ साली मरोळ नाका येथील नवपाड़ा झोपडपट्टीचे पुनर्वसन केले. नवपाड़ा वस्तीत ते लहानाचे मोठे झाले. वयाच्या २२ व्या वर्षापासून त्यांनी सिपीएमच्या युवक आघाडी पासून आपले काम सुरु केले. त्यांची कार्याची ओळख मुंबई, महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातलीवर एक लढाऊ, प्रमाणिक कमुनिस्ट नेता म्हणून आहे. याच कॉम्रेड शैलेंद्र कांबळे यांनी ८६ प्रभागात उभाठा, मनसे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना आणि भाजपापुढे मोठे आव्हान उभे केले आहे. आज ते सीपीएमचे मुंबई जनरल सेक्रेटरी असून त्यांच्या नेतृत्वाखाली आणखीन ८ नेते विविध वॉर्डमधून निवडणूक लढवत आहेत.














