Homeताज्या बातम्याधारावी मास्टर प्लॅन प्रसिद्ध – पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक विकासाला चालना - मुख्यमंत्री

धारावी मास्टर प्लॅन प्रसिद्ध – पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक विकासाला चालना – मुख्यमंत्री

धारावी मास्टर प्लॅन प्रसिद्ध – पर्यावरणपूरक आणि सर्वसमावेशक विकासाला चालना – मुख्यमंत्री

मुंबई, दि. २८ ( प्रतिनिधी )

देशाच्या सर्वात मोठ्या झोपडपट्टीपैकी एक असलेल्या धारावीच्या पुनर्विकासासाठी तयार करण्यात आलेला मास्टर प्लॅन आज अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा मास्टर प्लॅन पर्यावरणपूरक, एकात्मिक आणि सर्वसमावेशक विकासाच्या दृष्टीकोनातून राबवण्यात येणार असून, स्थानिक कारागिरांचे पुनर्वसन, व्यावसायिक क्षेत्राचा सन्मान आणि मूळ रहिवाश्यांना न्याय देणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट राहणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या आढावा बैठकीत या मास्टर प्लॅनची अधिकृत घोषणा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “धारावीचा पुनर्विकास करताना केवळ घरे नव्हे, तर येथील पारंपरिक व्यवसाय, कौशल्याधारित कामगार, आणि सामाजिक रचना जपणे अत्यंत आवश्यक आहे. या मास्टर प्लॅनमध्ये प्रत्येक पात्र धाराविकराला घर आणि व्यवसायासाठी आवश्यक जागा देण्याची तरतूद करण्यात आली आहे. धारावीचे मूळ वैशिष्ट्य जपतच आधुनिक शहररचनेसह विकास घडवण्याचा आपला संकल्प आहे.”

धारावीतील सूक्ष्म उद्योजकता, स्थानिक कारागिरी आणि पारंपरिक व्यवसायांचे जतन करत त्यांच्या पुनर्वसनासाठी खास धोरणे या मास्टर प्लॅनमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच, प्रकल्पात सहभाग असलेल्या प्रत्येक धाराविकराच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर भर दिला आहे.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनीही प्रकल्पासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या आणि प्रशासकीय कार्यवाही वेगाने पार पाडण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले. धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवास यांनी या वेळी प्रकल्पाची सविस्तर माहिती सादर केली.या बैठकीस महसूल, गृहनिर्माण, नगरविकास, नियोजन, वित्त, म्हाडा आणि एमएमआरडीए विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!