Homeताज्या बातम्यादलित पँथरचा ५४ वा वर्धापन दिन चैत्यभूमीवर उत्साहात; ज. वि. पवार आणि...

दलित पँथरचा ५४ वा वर्धापन दिन चैत्यभूमीवर उत्साहात; ज. वि. पवार आणि अविनाश महातेकर अनेक वर्षांनी एकाच मंचावर

मुंबई | मंगेश म्हात्रे

दलितांवरील अन्याय-अत्याचाराविरोधात संघर्षाची मशाल पेटवणाऱ्या दलित पँथर संघटनेचा ५४ वा वर्धापन दिन शुक्रवारी (२९ मे) दादर येथील चैत्यभूमीवर उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यंदाच्या वर्धापन दिन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दलित पँथरचे सहसंस्थापक ज. वि. पवार आणि ज्येष्ठ नेते अविनाश महातेकर हे अनेक वर्षांनंतर एकाच मंचावर उपस्थित राहिले.

वर्धापन दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा ‘पँथर पुरस्कार’ देऊन गौरव करण्यात आला. माजी परिवहन मंत्री गंगाधर गाडे, रिपब्लिकन नेते मनोजभाई संसारे आणि ‘सम्राट’ वृत्तपत्राचे संस्थापक बबन कांबळे यांना पँथर पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच डॉ. विनंती पोळ, डॉ. अर्चना हांडोरे आणि ज्युनिअर मिस इंडिया कॉन्फिडंट जिया गायकवाड यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला संदेश विठ्ठल उमप यांनी बुद्ध-भीम गीतांच्या सादरीकरणातून पँथर चळवळीला अभिवादन केले. यावेळी ज. वि. पवार यांनी मार्गदर्शन करताना दलित पँथरच्या नावाने कार्यरत असलेल्या विविध संघटनांना एकत्र आणण्याचा निर्धार व्यक्त केला. तर अविनाश महातेकर यांनी पँथरच्या संघर्षमय इतिहासातील आठवणींना उजाळा देत कार्यकर्त्यांना प्रेरित केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष निलेश मोहिते यांनी तरुणांनी सामाजिक अन्यायाविरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेत सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात प्रभावी आंदोलने उभारण्याचे आवाहन केले.

चैत्यभूमीवरील हा सोहळा पँथर चळवळीच्या ऐतिहासिक वारशाची आणि सामाजिक न्यायासाठीच्या संघर्षाची नव्याने आठवण करून देणारा ठरला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

महाराष्ट्रात राहायचं तर मराठी बोलावंच लागणार!

रिक्षा-टॅक्सीवाल्यांनो, मराठी येत नसेल तर गाड्या थांबवा; उद्यापासून सरकारचा कडक निर्णय! - व्यावहारिक मराठी न बोलल्यास बॅज आणि परवाना थेट रद्द होणार - परिवहन...

error: Content is protected !!