Homeक्राईमम्हाडाच्या २०% घरांचा कोटा हडप!

म्हाडाच्या २०% घरांचा कोटा हडप!

नाशिकमध्ये बनावट मोजणी नकाशांचा घोटाळा; ४९ जमीनदार आणि बिल्डरांवर गुन्हा दाखल

मुंबई : मंगेश म्हात्रे 

आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी राखीव असलेला म्हाडाच्या घरांचा २० टक्के कोटा हडप करण्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. बनावट मोजणी नकाशे तयार करून प्रशासनाची दिशाभूल केल्याप्रकरणी ४९ जमीनदार आणि बिल्डरांविरोधात नाशिक शहरातील सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील रिअल इस्टेट क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणी भूमी अभिलेख विभागाचे बिपीन काजळे यांनी तक्रार दाखल केली आहे. नगरविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार ४ हजार चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रावर उभारल्या जाणाऱ्या गृहप्रकल्पांमध्ये २० टक्के जागा आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गटासाठी राखीव ठेवणे बंधनकारक आहे. या अंतर्गत तयार होणारी घरे म्हाडाकडे देणे अपेक्षित असते.

मात्र हा नियम टाळण्यासाठी काही जमीनमालक, बिल्डर आणि त्यांचे अज्ञात सहकारी यांनी संगनमत करून जमिनीचे कागदोपत्री तुकडे करून क्षेत्रफळ ४ हजार चौरस मीटरपेक्षा कमी असल्याचे दाखवले, असा आरोप करण्यात आला आहे. यासाठी बनावट मोजणी नकाशे तयार करून प्रशासनाची दिशाभूल करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे.

या प्रकरणाबाबत म्हाडाने शंका उपस्थित केल्यानंतर नाशिक जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार विशेष समितीची स्थापना करण्यात आली होती. या समितीने म्हसरूळ, वडनेर दुमाला, देवळाली, आडगाव, आगारटाकळी, विहितगाव, नाशिक शहर, नांदूर नाका, पंचक, गंगापूर आणि चेहडी या भागांतील १०८ प्रकरणांची चौकशी केली.

चौकशीत ४९ प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मोजणी न करता मोजणी झाल्याचे दाखवून बनावट नकाशे तयार केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. भूमी अभिलेख कार्यालयातील नोंदी तपासल्यावर या प्रकरणांबाबत अधिकृत नोंदीच नसल्याचेही उघड झाले आहे.

तपासादरम्यान काही जणांनी बनावट मोजणी नकाशे तसेच हिस्सा फॉर्म क्रमांक ११ आणि १२ तयार करून ते तहसील कार्यालयात सादर केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गरिबांसाठी राखीव असलेली कोट्यवधी रुपयांची जमीन हडप करण्यासाठी हा डाव रचल्याचा आरोप होत असून सरकारवाडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घोटाळ्यात आणखी किती जणांचा सहभाग आहे, याचा पोलीस सध्या पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!