ठाणे : प्रतिनिधी
बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या टिटवाळा शहर अध्यक्षपदी सुनील मगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव तुळशीराम मगरे यांनी ठाणे, वागळे इस्टेट येथील संस्थेच्या कार्यालयात सुनील मगरे यांना नियुक्तीपत्र प्रदान करून ही नियुक्ती जाहीर केली.
या प्रसंगी बहुजन शक्ती संस्थेचे अध्यक्ष परेश मोटे, मुंबई अध्यक्ष विशाल कांबळे, बाबासाहेब साबळे, सुरज मगरे, फ्रान्सिस खंडागळे , अजय मगरे, शुभम वारे आदी मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी सुनील मगरे यांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
नियुक्तीनंतर सुनील मगरे यांनी बहुजन समाजाच्या प्रश्नांवर काम करत संस्थेची संघटना टिटवाळा परिसरात अधिक बळकट करण्याचा संकल्प व्यक्त केला.




















