Homeताज्या बातम्याअथर्व युनिव्हर्सिटीचा जागतिक दर्जाकडे प्रवास : कुलपती डॉ सुनील राणे 

अथर्व युनिव्हर्सिटीचा जागतिक दर्जाकडे प्रवास : कुलपती डॉ सुनील राणे 

शिक्षक दिनानिमित्त १०० आदर्श शिक्षकांचा सन्मान….

मुंबई, दि.५ : मंगेश म्हात्रे

शिक्षक दिनाचे औचित्य साधत अथर्व युनिव्हर्सिटी, मुंबई व अथर्व फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने मालाड (प.) येथील अथर्व युनिव्हर्सिटीच्या सभागृहात भव्य कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मुंबई, नवी मुंबई व मीरा-भाईंदर परिसरातील १०० आदर्श शिक्षकांना त्यांच्या नाविन्यपूर्ण कार्यासाठी, समर्पणासाठी आणि विद्यार्थ्यांच्या जीवनावर कायमस्वरूपी प्रभाव पाडल्याबद्दल गौरविण्यात आले.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अथर्व युनिव्हर्सिटीचे संस्थापक आणि कुलपती डॉ. सुनील राणे यांनी भूषवले. यावेळी आमदार योगेश सागर, अथर्व फाउंडेशनच्या उपाध्यक्ष वर्षा राणे, कर्नल सुधीर राजे, उद्योजक अशोक धामाणकर, भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष राजू बंडगर, डॉ. प्रवीण नेभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

कुलपती डॉ. सुनील राणे म्हणाले, “अथर्व युनिव्हर्सिटी ही जागतिक स्तरावर आधुनिक शिक्षण देणारी संस्था म्हणून उदयास येत आहे. आमच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान व नवोन्मेषाचा अनुभव मिळावा यासाठी प्रयत्नशील आहोत. अमेझॉनकडून ६५ लाख वार्षिक पॅकेज मिळवणारा मुंबईतील एकमेव विद्यार्थी अथर्वचा आहे, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”

तसेच, आयआयटी मुंबईच्या पहिल्या उपग्रह प्रकल्पासाठी अथर्व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थ्यांनी रिसीव्हिंग ग्राउंड स्टेशन उभारून महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय, मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत एचएफ हॅम कम्युनिकेशन सेटअप स्थापन करणारी पहिली संस्था म्हणून अथर्वचे विशेष स्थान असल्याचे त्यांनी नमूद केले.

भविष्यात अमेरिका व परदेशातील विद्यार्थी देखील आमच्या युनिव्हर्सिटीत आधुनिक व दर्जेदार शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतील, असा आम्हाला विश्वास आहे,” असे डॉ. राणे म्हणाले.

यावेळी आमदार योगेश सागर यांनी शिक्षकांचा गौरव करताना सांगितले की, “देश महाशक्तीकडे वाटचाल करत असताना विद्यार्थ्यांना घडवण्याचे व त्यांची स्वप्नपूर्ती करण्याचे काम शिक्षक करत आहेत. शिक्षक निवृत्त झाल्यानंतरही विद्यार्थ्यांना प्रेरणा देत राहतात. अशा १०० शिक्षकांचा गौरव करण्याचे कार्य अथर्व युनिव्हर्सिटीकडून होत असल्याने ही अभिमानाची बाब आहे,” असे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निवेदिका भार्गवी चिरमुले यांनी केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!