Homeताज्या बातम्याआंबेडकरी चळवळ अपात्र ठरण्याऐवजी पात्र ठरवली, तरच पुढच्या पिढीसमोर दलित पँथरचा तेजस्वी...

आंबेडकरी चळवळ अपात्र ठरण्याऐवजी पात्र ठरवली, तरच पुढच्या पिढीसमोर दलित पँथरचा तेजस्वी इतिहास अधिक उजागर होईल – अर्जुन डांगळे

मुंबई, दि.८ : महादू पवार

“आंबेडकरी चळवळ अपात्र ठरण्याऐवजी पात्र ठरवली, तरच पुढच्या पिढीसमोर दलित पँथरचा तेजस्वी इतिहास अधिक उजागर होईल ” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व रिपब्लिकन नेते अर्जुन डांगळे यांनी केले.
चेंबूर येथील सर्वोदय बुद्ध विहारामध्ये पँथर नेते अरविंद निकाळजे यांच्या अमृत महोत्सवी सन्मान सोहळ्यात बोलताना डांगळे म्हणाले की, सध्याच्या बदलत्या सामाजिक-राजकीय परिस्थितीत आंबेडकरी चळवळीने अधिक ताकदवान होणे आवश्यक आहे. यावेळी साहित्यिक प्रमोद आगलावे यांनी आवाहन केले की,

“रिपब्लिकन आंबेडकरी चळवळीने सर्व मतभेद बाजूला ठेवून निळ्या ध्वजाखाली एकत्र यावे.” पँथर नेते सुरेश केदारे यांनी चळवळीची नवी संकल्पना उभी करण्याची गरज व्यक्त केली, तर रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस गौतम सोनावणे यांनी नव्या पिढीच्या निष्क्रियतेबद्दल चिंता व्यक्त करत जुन्या पिढीच्या कार्यकर्त्यांचे आदर्श पुढे करण्याचे आवाहन केले.

निकाळजे यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी विशेष पुस्तिका प्रकाशित करण्यात आली. त्यांच्या समाजकारणातील योगदानाचा गौरव मान्यवरांनी केला. यावेळी श्रीकांत तळवटकर, अँड .धम्मकिरण चेन्ने, दिलीप कटारे, गौतम सांगळे, पत्रकार मधु कांबळे, नितीन मोरे आदी क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली होती.

समाजाच्या हक्कांसाठी अखेरपर्यंत लढा देणारे निकाळजे हे पँथर चळवळीचे खरे आधारस्तंभ असल्याचे मान्यवरांनी नमूद केले. या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भदंत राहुल बोधी यांनी “बुद्ध धम्म जगभर पसरत आहे, त्यामुळे आंबेडकरी चळवळीचे भविष्य उज्ज्वल आहे,” असे सांगत आशावाद व्यक्त केला. त्रिसरण घेऊन कार्यक्रमाची सांगता झाली. अखेरीस अरविंद निकाळजे यांचा सत्कार करण्यात येऊन उपस्थितांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!