Homeताज्या बातम्याकोकमठाण-शामवाडी ग्रामस्थांचा इंडस टॉवरसाठी दिलेल्या ११०० के. व्ही. लाईनविरोधात आक्रोश;

कोकमठाण-शामवाडी ग्रामस्थांचा इंडस टॉवरसाठी दिलेल्या ११०० के. व्ही. लाईनविरोधात आक्रोश;

वीज पुरवठा बंद करण्याची मागणी….

कोपरगाव, दि.१९ : दिलीप गायकवाड 

कोपरगाव तालुक्यातील मौजे कोकमठाण,शामवाडी ३ चारी येथील ग्रामस्थांनी इंडस कंपनीच्या (एअरटेल आदी) मोबाईल टॉवरसाठी दिलेला ११०० के.व्ही. एक्सप्रेस लाईनवरील विद्युत प्रवाह कायमस्वरूपी बंद करण्याची लेखी मागणी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे केली आहे.

 एकनाथ रामचंद्र नेहे, गोकुळ नेहे, देविदास लोखंडे, राजेंद्र नेहे, उषाबाई थोरात यांच्यासह ग्रामस्थांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कोकमठाण शिवारातील सर्व्हे नं. ३७९/२ व ३७९/४३ मधून टाकण्यात आलेली ही विद्युत लाईन २४ तास प्रवाहीत असल्याने परिसरातील रहिवाशांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. लाईन व टॉवरमुळे होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे माणसे, चिमण्या, पक्षी व पर्यावरण यावर दुष्परिणाम होत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.

मे २०२५ रोजी या लाईनखाली मंडपाचे काम करीत असताना सागर नेहे, गणेश पवार, मनीषा कदम व अलंका नेहे यांना विद्युत धक्का बसून गंभीर दुखापत झाल्याची घटना घडली होती. याबाबत कोपरगाव पोलिस ठाण्यात विज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणाविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

ग्रामस्थांचे म्हणणे आहे की, इंडस कंपनी व जागामालक यांनी जमीनमालकांची रितसर परवानगी घेतलेली नाही. कोणताही करार न करता बेकायदेशीररित्या विद्युत सप्लाय सुरू असून यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. भविष्यात जर कुणाला इजा अथवा मृत्यू झाला, तर यासंदर्भात इंडस कंपनी, जागामालक व वीज वितरण कंपनीच जबाबदार राहील, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

ग्रामस्थांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीला यापूर्वीही लेखी तक्रार दिली असून, आता एक्सप्रेस लाईनवरील प्रवाह कायमस्वरूपी खंडित करून टॉवरचे स्थलांतर करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!