Homeताज्या बातम्याचौदाव्या म्हाडा लोकशाही दिनात ९ अर्जांवर सुनावणी; नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय

चौदाव्या म्हाडा लोकशाही दिनात ९ अर्जांवर सुनावणी; नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ निर्णय

मुंबई, दि. १३ : मंगेश म्हात्रे

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) आज वांद्रे (पूर्व) येथील गृहनिर्माण भवनात चौदावा लोकशाही दिन मोठ्या पारदर्शकतेने आणि नागरिकाभिमुखतेने पार पडला. ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत नागरिकांच्या एकूण ९ अर्जांवर सुनावणी घेण्यात आली.

या लोकशाही दिनात जयस्वाल यांनी “नागरिकांप्रती जबाबदारी, पारदर्शकता आणि न्यायप्रिय प्रशासन हेच म्हाडाचे ब्रीद असावे” असे सांगत सामाजिक बांधिलकी जपत तात्काळ निर्णय घेतले.

यातील एक महत्त्वाचा प्रकरण म्हणजे श्रीमती सुनिता चेऊलकर यांचा अर्ज. विक्रोळी येथील कन्नमवार नगरमधील संक्रमण शिबिरातील गाळा त्यांच्या आईच्या नावे असून सध्या त्यांच्या दिवंगत बहिणीचे पती तिथे राहत आहेत. त्यांनी पुनर्विवाह केल्याने श्रीमती चेऊलकर यांनी सदर गाळा आपल्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना २४ तासांत गाळा रिकामा करण्याची नोटीस बजावण्याचे आणि पोलिस बंदोबस्तात दिवाळीपूर्वी चेऊलकर यांना ताबा देण्याचे निर्देश दिले.

तसेच, स्वप्निल निकम यांच्या अर्जावर सुनावणी करताना जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थकित भाडे वसूल करून आणि हमीपत्र घेऊन गाळ्याचा ताबा देण्याचे आदेश दिले.

शैला खंदारे यांच्या अंधेरीतील झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाशी संबंधित अर्जावर मुंबई मंडळाचे भूव्यवस्थापक रेडेकर यांनी तत्काळ दखल घेऊन १४ ऑक्टोबर रोजी सुनावणी ठरवली. या तत्परतेबद्दल जयस्वाल यांनी रेडेकर यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

आजच्या लोकशाही दिनात एकूण ९ अर्जांची सुनावणी झाली, त्यात आर आर मंडळाचे ४, कोकण मंडळाचे ३ आणि मुंबई मंडळाचे २ अर्जांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!