Homeताज्या बातम्याझोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेत;आता इमारतींनाही ‘झोपडपट्टी’त गणले जाणार!

झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेत;आता इमारतींनाही ‘झोपडपट्टी’त गणले जाणार!

मुंबई, दि. ७ : मंगेश म्हात्रे

राज्य सरकारने झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) माध्यमातून ‘झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजना’ राबविण्याला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी दिली असली, तरी या योजनेवर आता नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. कारण, या योजनेत जुन्या इमारती, भाडेकरू व्याप्त बांधकामे आणि खासगी मालमत्ता असलेल्या जागांनाही झोपडपट्टीत गणले जाण्याचा धोका निर्माण झाला आहे.

झोपडपट्टी नव्हे, ‘इमारतींचाही पुनर्विकास’ मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार : झोपडपट्टी समूह पुनर्विकास योजनेतील काही इमारती विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, २०३४ मधील विनियम ३३(१०) व्यतिरिक्त इतर तरतुदींनुसार (उदा. ३३(७), ३३(५), ३३(९) किंवा अन्य) विकासास पात्र असतील, तर अशा इमारतींचा समूह पुनर्विकासामध्ये समावेश केल्यास त्यांना ३३(१०) अंतर्गत देण्यात येणारा लाभ किंवा संबंधित तरतुदींनूसार मिळणारा लाभ यांपैकी जो जास्तीचा असेल तो देण्यात येईल.

सरकारच्या या नव्या योजनेनुसार, ५० एकरांपेक्षा जास्त क्षेत्रातील झोपडपट्ट्यांसोबतच जुन्या इमारती आणि मोकळ्या जागांनाही समूह पुनर्विकासात सामावले जाऊ शकते. त्यामुळे अनेक जुन्या वसाहती आणि इमारतींचे रहिवासीही जबरदस्तीच्या पुनर्विकासाच्या कचाट्यात अडकू शकतात, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

स्थानिक रहिवासी संघटनांचे म्हणणे आहे की, “ही योजना झोपडपट्टी पुनर्वसनापेक्षा विकासकांना अधिक अनुकूल आहे. खऱ्या अर्थाने पुनर्वसनाऐवजी रिअल इस्टेटच्या बाजारपेठेला चालना देणारी ही योजना ठरणार आहे.”

नगररचना तज्ञांच्या मते, या योजनेचा परिणाम शहराच्या सामाजिक संरचनेवर गंभीर होऊ शकतो. “एकात्मिक विकास” या नावाखाली झोपडपट्टीसह शेजारच्या इमारतींनाही एकत्र करून प्रचंड मोठे प्रकल्प उभारले जातील, ज्यात सामान्य नागरिकांची भूमिका गौण राहील, असे तज्ज्ञांचे मत आहे.

विकास नियंत्रण नियमावली २०३४ अंतर्गत विकासकांना ४ पेक्षा अधिक FSI देण्याची तरतूदही करण्यात आली आहे. त्यामुळे उच्च इमारती, गर्दी आणि मूलभूत सुविधांवर ताण वाढेल, असा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे.

शहरातील झोपडपट्ट्यांचा चेहरामोहरा बदलण्याऐवजी नव्या योजनेमुळे नागरिकांचे अस्तित्वच धोक्यात येईल, असा आरोप अनेकांनी केला आहे.

“झोपडपट्टी पुनर्वसनाच्या नावाखाली आता इमारतींचा ही पुनर्विकास — सरकारचा नवा प्रयोग, पण त्याचा फटका पुन्हा सामान्य मुंबईकरालाच बसणार!”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माझं गाव माझा अभियान’च्या ‘प्रतिकात्मक दशक्रिया विधी’ आंदोलनाला मोठे यश; पुणतांबे फाटा- साईबाब काॅर्नर...

कोपरगाव : दिलीप गायकवाड पुणतांबे फाटा ते येसगाव दरम्यान सतत होत असलेल्या जीवघेण्या अपघातांविरोधात ‘माझं गाव माझा अभियान’च्या वतीने करण्यात आलेल्या ‘प्रतीकात्मक दशक्रिया विधी आणि...

शिवसेना पक्ष कार्यालयातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचे काम होईल

ठाणे मनपातील शिवसेना गटनेते कार्यालयाचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन ठाणे,दि.१९.( अजय मगरे )   नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शिवसेनेचे पक्ष कार्यालय प्रभावी माध्यम ठरेल, असा विश्वास...

नीट पेपरफुटी प्रकरणी युवक काँग्रेसची मुंबई मेट्रोमध्ये जनजागृती मोहीम…

भाजपच्या संरक्षणाखालीच पेपरफुटी रॅकेट फोफावल्याचा आरोप.... मुंबई, दि.१९.( अजय मगरे ) नीट पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ इंडियन यूथ काँग्रेस च्या मुंबई विभागाने रविवारी मुंबई मेट्रोमध्ये प्रवाशांशी संवाद...

कांद्याचे भाव कोसळल्याने समृद्धी एक्स्प्रेस वे ३० मिनिटे रोखून धरला

शेतकरी आणि कामगार - अनेकांनी कांद्याचे हार घातले - एक्स्प्रेसवेवर जमले आणि निषेध सुरू केला.MLC अंबादास दानवे, शिवसेना (UBT) पदाधिकारी, शेतकरी आणि कामगारांसह...

इंधन दरवाढीच्या पार्श्वभूमीवर एसटी भाडेवाढीचा प्रस्ताव विचाराधीन – मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : अजय मगरे वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या प्रवासी भाडेवाढीचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून, तत्काळ कोणतीही भाडेवाढ करण्यात येणार नसल्याची...

error: Content is protected !!