Homeताज्या बातम्याटिटवाळ्यात भीम जयंतीचा जल्लोष; रेजन्सी सर्वम कॉलनीत उत्साहाचा सोहळा

टिटवाळ्यात भीम जयंतीचा जल्लोष; रेजन्सी सर्वम कॉलनीत उत्साहाचा सोहळा

टिटवाळा, दि.१३.( अजय मगरे )

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त टिटवाळ्यातील रेजन्सी सर्वम ३१,३२,३३,३४ कॉलनीत उत्साहाचा आणि जल्लोषाचा माहोल पाहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ ते १४ एप्रिल दरम्यान हा भव्य जयंती उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जात असून कॉलनीतील रहिवाशांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.

मंगल मैत्री प्रतिष्ठान उत्सव समितीच्या वतीने आयोजित या सोहळ्यात विविध सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल आहे. ११ एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त आयु. आबा मुळीक यांचे एकपात्री नाटक सादर करण्यात आले, ज्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला.

१२ एप्रिल रोजी आयु. सुरेखा पैठनेताई यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांच्या हक्कांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या हिंदू कोड बिलासह संविधानिक हक्कांवर सखोल प्रबोधन करण्यात आले. तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये बालचिमुकल्यांनी उत्साहाने सहभाग नोंदवला.

या जयंती उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मंगल मैत्री प्रतिष्ठानचे कार्यकर्ते भगवान धुळधुळे, विजय मोहिते, प्रीतम निकम, रवींद्र भालेराव, युवानंद मेश्राम,ज्ञानेश्वर भंडारे, राहुल बनसोडे, जयदीप वैराळ, भालेराव, हरीश गजबीये, अक्षय मोहिते, संकेत येलवे, स्वनिल सावंत यांनी परिश्रम घेतले. अध्यक्ष मिलिंद सावंत, अभय कदम आणि बहुजन शक्तीचे अध्यक्ष सुनिल मगरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा उत्साहात पार पडत आहे.

संपूर्ण कॉलनीत जयंती निमित्ताने सणासुदीचे वातावरण निर्माण झाले असून सामाजिक एकोपा, बंधुभाव आणि विचारजागृतीचा संदेश या निमित्ताने दिला जात आहे. टिटवाळ्यातील हा भीम जयंती उत्सव नागरिकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!