Homeताज्या बातम्याठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २.४४ कोटींच्या ३२ चारचाकी वाहने जप्त.

ठाणे गुन्हे शाखेची मोठी कारवाई; २.४४ कोटींच्या ३२ चारचाकी वाहने जप्त.

ठाणे,दि.१७.( अजय मगरे )

ठाणे गुन्हे शाखा वागळे युनिट क्र. ५ कडून वाहने भाड्याने लावून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या इसमाला अटक करून तब्बल रु. २,४४,१५,०००/- किंमतीची ३२ विविध चारचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.

वागळे इस्टेट पोलीस ठाणे येथे गु. र. नं. ४०/२०२६ भा.व्या.सं. कलम ३१८(४), ३१६(२) अन्वये दि. ०५/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी यांची चारचाकी वाहने आरोपी नामे संदीप रघु शेट्टी (वय ३८ वर्ष, रा. उलवे, नवी मुंबई) याने जास्त मासिक भाडे देण्याचे आमिष दाखवून ताब्यात घेतली होती. मात्र कोणतेही भाडे न देता तसेच वाहने परत न करता ती इतर व्यक्तीकडे परस्पर गहाण ठेवून वाहनांचा अपहार करून फसवणूक केल्याचे उघड झाले. आरोपी स्वतःचे अस्तित्व लपवून राहत असल्याचेही तपासात निष्पन्न झाले.

तपासादरम्यान आरोपीच्या मोबाईल क्रमांकाचे तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त बातमीदाराच्या माहितीच्या आधारे दि. ०६/०२/२०२६ रोजी त्यास अटक करण्यात आली. चौकशीत त्याने अनेक व्यक्तींना अधिक मासिक भाड्याचे आमिष दाखवून त्यांची वाहने ताब्यात घेऊन इतरांकडे गहाण ठेवल्याची कबुली दिली.

सखोल तपासानंतर आरोपीकडून सुमारे रु. २,४४,१५,०००/- किंमतीची ३२ चारचाकी वाहने नवी मुंबई, जालना, आळेफाटा, लोणावळा, पुणे, छत्रपती संभाजीनगर, पनवेल, कल्याण व परभणी येथून जप्त करण्यात आली असून, वाहनांची संख्या वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक श्री. शरद युवराज पाटील करीत आहेत.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) डॉ. पंजाबराव उगले, पोलीस उपआयुक्त (गुन्हे) अमरसिंह जाधव, सहायक पोलीस आयुक्त (शोध-१ गुन्हे) शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट ५ वागळे ठाणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले व त्यांच्या पथकाने केली आहे..

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!