Homeताज्या बातम्याडिस्टिलरीकडून सांडपाणी शेतात गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार 

डिस्टिलरीकडून सांडपाणी शेतात गेल्याची शेतकऱ्यांची तक्रार 

कोपरगाव, दि. १० : दिलीप गायकवाड

कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना गौतमनगर, सुरेगांव, कोळपेवाडी, ता.कोपरगांव, जिल्ह्य अहिल्यानगर,कारखान्याच्या डिस्टिलरी:

विभागाकडून सांडपाणी मौ.कोळगावमाळ, ता.सिन्नर, जिल्ह्य, नाशिक,परिसरातील शेतात गेल्याचा आरोप स्थानिक काही शेतकऱ्यांनी केला आहे. या संदर्भात शेतकरी उत्तम मोकळ यांनी जिल्हाधिकारी, तहसीलदार तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, नाशिक यांच्याकडे लेखी तक्रार सादर केली आहे.

मोकळ यांनी तक्रारीसोबत काही छायाचित्रे आणि नकाशे जोडले असून, या प्रकरणात योग्य तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. शेतकऱ्यांच्या मते, कारखान्याच्या परिसरातील काही ठिकाणी दूषित पाण्याचा प्रवाह झाल्याने शेती आणि परिसरावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

या तक्रारीबाबत सत्यता जाणून घेण्यासाठी बहुजन शक्ती ऑनलाईन न्यूजने घटनास्थळी पाहणी केली असता यावेळी स्थानिक शेतकरी राजु मनोहर मोकळ मारुती थोरात, संपत दादा गवाडे, दशरथ मोकळ, ज्ञानेश्वर मोकळ, लक्ष्मण कारले आदी उपस्थित होते. त्यांनी या बाबतीत प्रशासनाने लवकरात लवकर चौकशी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

या संदर्भात कारखाना प्रशासनाशी संपर्क साधला असता, डिस्टिलरी विभागाचे जनरल मॅनेजर आभाळे अनुपलब्ध असल्याचे वाचमेनकडून समजले. त्यानंतर सचिव बी.बी. सय्यद यांनी सांगितले की, “या विषयावर मी काही सांगू शकत नाही, अधिकृत भूमिका कार्यकारी संचालक स्पष्ट करतील.”

यानंतर कार्यकारी संचालक एस.एस. बोरनारे यांनी सांगितले की, “पुणे न्यायालयाच्या आदेशानुसार आणि शासनाच्या निर्देशांनुसार आम्ही सर्व नियमांचे पालन करूनच काम करीत आहोत. या प्रकरणावर आवश्यक ती कार्यवाही सुरू आहे.”

दरम्यान, शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे योग्य तपासणी करून दूषित पाणी थांबविण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी केली असून, कारखाना प्रशासनानेही सर्व प्रक्रिया नियमांनुसार सुरू असल्याचे स्पष्ट केले आहे.

कारखान्याचा दावा:

“शासनाच्या निर्देशांनुसार सर्व आवश्यक ती कार्यवाही सुरू असून, नियमांचे पालन केले जात आहे.”

शेतकऱ्यांची मागणी:

“सांडपाणी नियंत्रणाबाबत तपासणी करून योग्य ती उपाययोजना करण्यात यावी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!