नसरापूर, दि.२४ : ( सतीश गायकवाड )
जाणता राजा प्रतिष्ठान तर्फे नसरापूर बनेश्वर येथील जानकीराम मंगल कार्यालयात २४ ऑगस्ट रोजी संविधान वाचन व संविधान प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या स्पर्धेत एकूण १३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे सात वर्षांच्या बालिकेने व एका दृष्टीहीन मुलाने सहभाग घेतल्याने उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले. स्पर्धेत विजेत्यांना रोख रक्कम व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्रथम पारितोषिक विजेत्यास मा. महेश दादा मरळ यांच्यातर्फे ७ हजार रुपये, द्वितीय पारितोषिक विजेत्यास रविंद्र मामा मांढरे यांच्यातर्फे ५ हजार रुपये तर तृतीय पारितोषिक विजेत्यास गौतम शेलार यांच्यातर्फे ३ हजार रुपये व सन्मानचिन्ह देण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन जाणता राजा प्रतिष्ठान, पुणे–महाराष्ट्रचे रघुनाथ बोरगे, हेमंत सोनवणे, प्रशांत शेटे व शशिकांत पवार यांनी केले. तर या वेळी डॉ. प्रशांत सकपाळ, बाळासाहेब शिंदे, एड.प्रकाश धोटे, दादासाहेब शेलार, संगीता मोरे, प्रवीण ओव्हाळ, महेंद्र साळुंखे, दत्तात्रय खुडे,मिलींद जगताप, तृप्ती कांबळे, सुनंदा गायकवाड, सुमेध थोरात, बाळासाहेब अडसूळ महाराज आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेत सहभागी सर्वांना भारतीय संविधानाची प्रत बार्टी (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिसर्च इन्स्टिट्यूट) तर्फे भेट देण्यात आली. यावेळी मान्यवरांनी संविधानाचा इतिहास, महत्त्व व उपयोगिता याबाबत मार्गदर्शन केले.




















