दावरवाडी, दि. ३ ( अभिजीत सोनवणे) —
पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये शुक्रवार, दि. ३ जानेवारी रोजी सकाळी ९ ते ११ या वेळेत आनंदनगरी मेळावा उत्साहात पार पडला.

या मेळाव्यात शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या घरातून विविध प्रकारचे खाद्यपदार्थ तयार करून विक्रीसाठी आणले होते. विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात लावलेल्या विविध खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्यवहारिक ज्ञान, आत्मविश्वास व उद्योजकतेचे प्राथमिक धडे मिळाले, असे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री. नवनाथ जाधव यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमास सरपंच विजय गायकवाड, उपसरपंच आसमानदादा काळे, माजी उपसरपंच रेवनाथ कर्डीले, मित्रवर्धन काळे, उदयसेन काळे, संतोष भोसले, ईश्वर कांबळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लखन भावले, बाबू सोनवणे, नवनाथ सोनवणे यांच्यासह शिक्षकवृंद व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिक्षकवर्गात गायकवाड मॅडम, हंडाळ मॅडम, आयनुले मॅडम, सोनटक्के मॅडम, चाबुकस्वार मॅडम, जया शिंदे, गोर्डे सर, गायकवाड सर, बुधनर सर, भालसिंग सर यांची उपस्थिती होती. तसेच गावातील युवक, पालक व विद्यार्थी मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते.














