Homeताज्या बातम्याप्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात...

प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती संस्थेच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी.

ठाणे, दि. १६ (अजय मगरे):

प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३४ वी जयंती ठाणे, अंबिका नगरातील प्रज्ञा फाऊंडेशन कार्यालयासमोर मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध सांस्कृतिक, स्पर्धात्मक व प्रेरणादायी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला आणि महिलांची रांगोळी स्पर्धा, महिलांसाठी खेळ पैठणीचा स्पर्धाचे बक्षीस वितरण समारंभ आयोजित करण्यात आला. परिसरातील महिलांनी व विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने हजेरी लावली.

याप्रसंगी ठाण्याचे मा.सहायक पोलीस आयुक्त अनिल वाघमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज केवळ भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात साजरी केली जाते. त्यांनी दलित, महिलांपासून ते कामगारांपर्यंत सर्व अपेक्षित घटकांसाठी आयुष्यभर संघर्ष केला. आजच्या पिढीला त्यांच्या कार्याची आणि योगदानाची जाणीव करून देणे ही आपली जबाबदारी आहे.”

आपल्या भाषणात त्यांनी तत्कालीन सामाजिक स्थितीचे वास्तव सांगत स्वतःच्या वडिलांच्या अनुभवातून शिक्षणाच्या संघर्षावर प्रकाश टाकला. “१९५०च्या दशकात माझे वडील शिक्षक असताना वर्गाबाहेर उभे राहून विद्यार्थ्यांना शिकवायचे. अशा परिस्थितीतूनच बाबासाहेबांनी समाजाला बाहेर काढले,” असे ते म्हणाले.

या कार्यक्रमात पोलीस उपनिरीक्षक कल्याण ढोकणे यांनीही मार्गदर्शन करताना सांगितले, “प्रज्ञा फाऊंडेशन ही अंबिका नगर परिसरासाठी संजीवनी सारखी ठरली आहे. आजची तरुण पिढी व्यसनांच्या आहारी जात आहे, शिक्षणापासून दूर जात आहे, ही चिंतेची बाब आहे. बाबासाहेबांनी हलाखीच्या परिस्थितीतून शिक्षण घेऊन समाजाला दिशा दिली. आपणही समाजासाठी काहीतरी दिले पाहिजे.”असे ते म्हणाले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वॉर्ड अध्यक्ष सिध्दार्थ मोरे यांनी केले तर आभार बाबासाहेब साबळे यांनी व्यक्त केले.

यावेळी प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्तीचे संस्थापक परेश मोटे, अध्यक्ष तुळशीराम मगरे, ऍड.अमित गायकवाड, वसंत मोरे गुरुजी,पोलिस हवालदार संतोष मगरे, गोरख साबळे, पत्रकार अजय मगरे, गोरख साबळे, अंकुश पोटफोडे, सुनिल मोरे, शरद मोरे, दिनकर एडके , आर्यन शरणांगत , आदित्य शरणांगत, सुरेश मगरे, उमेश जाधव, विशाल मोरे, नितिन सोनवणे, बाबासाहेब वाव्हळ , वॉर्ड अध्यक्ष मिलिंद डोंगरे , अमोल वाव्हळ , समीर साबळे , शाखा अध्यक्ष सुशांत साबळे गुरुजी, शुभम वारे, सुशील शरणांगत, पप्पू गायकवाड, विश्वास साबळे, प्रविण मगरे , स्वप्नील वारे, वंचित बहुजन आघाडीचे वागळे विभाग अध्यक्ष सुरेश मोरे, महिला ठाणे शहर उपाध्यक्ष आशाताई शारणांगत ,छायाताई बचुटे, परेगाताई डोंगरे, पार्वती ताई जाधव,आदी महिला,नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!