बतान (फिलिपिन्स), दि. १२ : प्रतिनिधी
बतान पेनिन्सुला स्टेट युनिव्हर्सिटी (BPSU), फिलिपिन्स आणि शारदा एज्युकेशन सोसायटी, ठाणे यांच्यातील सामंजस्य करार (MoU) आज BPSU च्या Office of the President येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
या MoU चा उद्देश शैक्षणिक देवाणघेवाण, संशोधन सहकार्य, कौशल्यविकास, अध्यापनातील नवनवीन उपक्रम राबविणे तसेच विद्यार्थी व शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील संधी उपलब्ध करून देणे हा आहे.
समारंभाला BPSU चे University President डॉ.समारंभाला BPSU चे University President डॉ. रुबी बी. सॅंटोस-मातिबाग, VPAA डॉ. लारा वेलास्को-डेला क्रूझ, VPSAS प्रा. अँड्रियन डी. पेरिडो, Assoc. Director, CAHS प्रा. मेयान रोझ मालेबानन, Director, INRO डॉ. जोअन्ने डी. लोब्रिनो, Dean, CTECH डॉ. रोवेना बी. वॅलेरियो, OC, Instruction डॉ. आलोनजो डी. मोंटेजो आणि Dean, CEA इंजि. रिगोर जी. रेगालाडो यांच्यासह इतर मान्यवर व अधिकारी उपस्थित होते.
शारदा एज्युकेशन सोसायटीच्या वतीने सचिव व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रा. प्रदीप ढवळ, आंतरराष्ट्रीयकरण संचालक डॉ. प्रतीक मुणगेकर तसेच रजिस्टर व कार्यालय अधीक्षक श्री. आकाश ढवळ विशेष उपस्थित होते.
करारानंतर झालेल्या चर्चेत BPSU च्या प्राध्यापकांनी सांगितले की, “या करारामुळे भारत व फिलिपिन्समधील विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना शैक्षणिक पद्धती, संशोधन व कौशल्याधारित शिक्षणाचे नवे मार्ग खुले होतील. जागतिक स्तरावरील सहकार्याची ही संधी दोन्ही देशांसाठी ऐतिहासिक आहे.”
या MoU अंतर्गत संयुक्त कार्यशाळा, आंतरराष्ट्रीय सेमिनार्स, विद्यार्थी देवाणघेवाण (Student Exchange Program) आणि संशोधन प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
समारंभाचे अध्यक्षस्थान डॉ. रुबी बी. सॅंटोस-मातिबाग यांनी भूषविले. त्यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, “शारदा युनिव्हर्सिटी बरोबरचा हा करार आमच्या विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा आहे. हे सहकार्य विद्यार्थी व संशोधकांसाठी भविष्य घडविणारे ठरेल.”शेवटी दोन्ही संस्थांच्या मान्यवरांच्या उपस्थितीत MoU वर स्वाक्षऱ्या करून सामंजस्य करार औपचारिकरीत्या पूर्ण झाला.




















