Homeताज्या बातम्याभाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखडा’ प्रभावीपणे राबवा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी ‘शिर्डी कृती आराखडा’ प्रभावीपणे राबवा – मुख्य सचिव राजेश अग्रवाल

सिंहस्थ कुंभमेळा नियोजनाचा शिर्डीत आढावा

शिर्डी, दि. १६ : दिलीप गायकवाड

नाशिक येथे २०२६–२७ मध्ये होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी येथे येणाऱ्या भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयार केलेला ‘शिर्डी कृती आराखडा’ सर्वसमावेशक असून, भाविकांची सुरक्षा, आरोग्य सुविधा व वाहतूक व्यवस्थापनाला सर्वोच्च प्राधान्य देत या आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी दिले.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी शिर्डी येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर आदी अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या सुरुवातीला जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांनी सादरीकरणाद्वारे तयारीची सविस्तर माहिती दिली. नाशिक कुंभमेळ्यासाठी येणाऱ्या एकूण भाविकांपैकी सुमारे २० ते २५ टक्के भाविक शिर्डी व शनिशिंगणापूर येथे दर्शनासाठी येण्याची शक्यता गृहीत धरून सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे. वाहतूक, पार्किंग, आरोग्य व आपत्ती व्यवस्थापनावर विशेष भर देण्यात आला आहे.
कुंभमेळा कालावधीत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ‘एकात्मिक वाहतूक आराखडा’ तयार करण्यात आला आहे. शहराबाहेर व मंदिरालगत सुमारे ९४ हेक्टर क्षेत्रावर ८ नवीन पार्किंग स्थळे निश्चित करण्यात आली असून, स्मार्ट पार्किंग व शटल बस सेवेचा समावेश असेल. आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिका व अग्निशामक दलाच्या गाड्या १५ ते २० मिनिटांत घटनास्थळी पोहोचण्यासाठी ‘ग्रीन कॉरिडॉर’ची व्यवस्था करण्यात येणार आहे. गर्दी नियंत्रणासाठी संवेदनशील ठिकाणी ड्रोन व सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार आहे.

भाविकांच्या मदतीसाठी विशेष प्रशिक्षित ‘क्राउड मार्शल्स’ तैनात करण्यात येणार आहेत. आरोग्य सुविधांसाठी श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसह परिसरातील रुग्णालये सुसज्ज ठेवण्यात येणार असून, अग्निशमन दलासाठी नवीन मल्टीपर्पज वाहने व प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून दिले जाणार आहे.
कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने शिर्डी विमानतळाची क्षमता वाढवून दररोज २० उड्डाणांचे नियोजन करण्यात आले आहे. देशातील १३ प्रमुख शहरांशी थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी तसेच प्रवाशांसाठी नाशिककडे २००, तर छत्रपती संभाजीनगर व पुण्याकडे प्रत्येकी ४० जादा बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. शनिशिंगणापूर येथेही स्वतंत्र पार्किंग व दर्शन रांगेचे नियोजन करण्यात आले आहे.

या सर्वंकष नियोजनाचे कौतुक करत मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून भाविकांना सुरक्षित व सुलभ दर्शनाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!