Homeताज्या बातम्याभोर शहरात ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट न मिळाल्याने नागरिक त्रस्त

भोर शहरात ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट न मिळाल्याने नागरिक त्रस्त

भोर, दि.२० : ( सतीश गायकवाड )

भोर उपजिल्हा रुग्णालयात अजूनही ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेटची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. वारंवार हेलपाटे मारूनही ही समस्या सुटत नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

लग्नानंतर महिलांना आधार कार्डावर नाव बदलण्यासाठी ऑनलाईन मॅरेज सर्टिफिकेट आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या आधार पोर्टलवर नाव बदलण्यासाठी बारकोड असलेले प्रमाणपत्र बंधनकारक आहे. मात्र भोर उपजिल्हा रुग्णालयातून दिली जाणारी प्रमाणपत्रे अद्यापही फक्त ऑफलाईन स्वरूपात असल्याने अनेकांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही.
यासंदर्भात भोर उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. साबणे यांनी सांगितले की, “राज्य शासनाकडून ऑनलाईन सर्टिफिकेटसंदर्भात कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे आलेली नाहीत. आदेश आल्यानंतरच आम्ही ऑनलाईन प्रमाणपत्र देऊ शकतो.”

दरम्यान, नागरिकांनी महाराष्ट्र शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदवली असता, “सध्या केवळ ग्रामपंचायतींना ऑनलाईन सर्टिफिकेट देण्याचा अधिकार आहे. शहरी भागातील नागरिकांना उपजिल्हा रुग्णालयातून ऑनलाईन सुविधा मिळणार नाही,” असे उत्तर मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
या परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे शासकीय योजनांपासून वंचित राहत असून, विशेषतः गर्भवती महिलांना आरोग्यविषयक योजनांचा लाभ न मिळाल्याने शासनाच्या दुर्लक्षाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!