Homeताज्या बातम्याभ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार - विक्रांत चव्हाण 

भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासणार – विक्रांत चव्हाण 

ठाणे, दि.१३.(अजय मगरे)

उच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ठाणे शहरातील अनधिकृत बांधकामांवर सुरू केलेली कारवाई थंडावली असुन ठाणे महापालिका प्रशासन ठाणेकरांची फसवणुक करीत आहे. असा घणाघाती आरोप काँग्रेसचे ठाणे शहर – जिल्हाध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत केला. आता तर उपायुक्त शंकर पाटोळे लाच प्रकरणाने पालिकेच्या अतिक्रमण विभागातील भष्टाचार चव्हाट्यावर आला असल्याने अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांना प्रशासनाने पाठीशी घातल्यास अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे.

ठाणे महापालिकेत बोकाळलेला भ्रष्टाचार आणि लाचखोरी विरोधात काँग्रेसने सोमवारी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेला शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्यासह मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, हिंदुराव गळवे आदिंसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी, या लाचखोर पाटोळेच्या कारनाम्यांचा पर्दाफाश सर्वप्रथम काँग्रेसनेच केला होता. याची आठवण करून दिली. तसेच, उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर ठाण्यात सुरु झालेली अनधिकृत बांधकामांवरील कारवाई का थांबली ? असा सवाल चव्हाण यांनी केला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा भाग असलेल्या येऊरच्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात शहर विकास विभागाने दिलेल्या परवानग्या नियमबाह्य आहेत. प्रशासनाने अनधिकृत बांधकामाची शास्ती माफ केली आहे. याबरोबरच अनधिकृत बांधकाम चौकशी प्रकरणी न्यायालयाने महापालिकेला विचारलेल्या १९ प्रश्नांना प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांनी थातुर मातुर उत्तरे देऊन पळवाटा शोधल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे. तेव्हा, पालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घातल्यास त्या अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळे फासण्याचा इशारा काँग्रेसने दिला आहे .

*लाचखोर पाटोळेला बडतर्फ करा*

२५ लाख रुपयांची लाचप्रकरणी अटकेत असलेला ठाणे महापालिकेचा लाचखोर निलंबित उपायुक्त शंकर पाटोळे याच्या चौकशीवर सत्र न्यायालयाने कडक ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे लाच प्रकरणातील त्यांचे कॉल रेकॉर्डिंग आणि व्हॉट्सॲप कॉल डिटेल्स देखील तपासले गेले पाहिजेत. तसेच एसीबीने पाटोळे यांच्या मालमत्तेची चौकशी करण्याबरोबरच पाटोळेच्या नातेवाईकांची देखील ईडी मार्फत चौकशी करावी, जेणेकरून भ्रष्टाचाराच्या मार्गाने किती माया जमवली याचा हिशोब उघड होऊन पाटोळेला अभय देणारे महापालिकेतील अधिकारी व राजकीय पुढारी यांचीही नावे समोर येतील. निलंबनाऐवजी पाटोळेला सेवेतून बडतर्फ करावे अशी मागणी काँग्रेस करणार असुन मागणी मान्य न झाल्यास जनहित याचिका दाखल करणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!