Homeताज्या बातम्याम्हाडाच्या ठाणे, वसई, बदलापूर येथील ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांसाठी १४ जुलैपासून...

म्हाडाच्या ठाणे, वसई, बदलापूर येथील ५,२८५ सदनिका आणि ७७ भूखंडांसाठी १४ जुलैपासून अर्ज सुरू …

लॉटरी ३ सप्टेंबर ला निघणार …

मुंबई, दि.१३ : मंगेश म्हात्रे

म्हाडा कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे, वसई, सिंधुदुर्ग व बदलापूर परिसरात एकूण ५,२८५ सदनिका व ७७ भूखंड विक्रीसाठी सोडत जाहीर करण्यात आली आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया १४ जुलैपासून सुरू होणार असून, संगणकीय सोडत ३ सप्टेंबर रोजी जाहीर होईल.

या योजनेचा ‘गो-लाइव्ह’ शुभारंभ १४ जुलै २०२५ रोजी दुपारी १ वाजता म्हाडाचे उपाध्यक्ष संजिव जयस्वाल यांच्या हस्ते होणार आहे. अर्ज नोंदणीसाठी अंतिम मुदत १३ ऑगस्ट २०२५ रात्रीपर्यंत ठेवण्यात आली आहे. तर अर्जांसोबतची अनामत रक्कम १४ ऑगस्ट २०२५ पर्यंत भरणे आवश्यक आहे. पात्र अर्जदारांची अंतिम यादी १ सप्टेंबर रोजी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल.

संगणकीय सोडत ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ठाण्याच्या डॉ. काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात होईल. निकाल तात्काळ अर्जदारांना मोबाईल एसएमएस, ई-मेल व अ‍ॅपद्वारे कळवला जाणार आहे.

कोकण मंडळाने यावेळी विविध गृहनिर्माण योजनांअंतर्गत सदनिका व भूखंडांची ही सोडत जाहीर केली आहे. त्यामध्ये २०% सर्वसमावेशक योजनेतील ५६५ सदनिका, एकात्मिक शहर गृहनिर्माण योजनेतील ३,००२ सदनिका, विखुरलेल्या सदनिका व ५०% परवडणाऱ्या घरांची अनुक्रमे १,६७७ व ४१ सदनिका तसेच ७७ भूखंडांचा समावेश आहे.

  • अर्ज प्रक्रियेसाठी म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in

या संकेतस्थळावर तसेच IHLMS 2.0 या अ‍ॅपद्वारे नोंदणी करता येईल. अर्जदारांना मार्गदर्शनासाठी माहितीपुस्तिका, व्हिडीओ व हेल्पफाईल संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. अर्ज करताना कुणाही दलाल, एजंट अथवा मध्यस्थाच्या प्रलोभनांना बळी पडू नये, असा इशाराही मंडळाच्या मुख्य अधिकारी रेवती गायकर यांनी दिला आहे. अर्ज प्रक्रियेत येणाऱ्या अडचणींसाठी हेल्पलाईन क्रमांक ०२२-६९४६८१०० उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

भारत ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत | पुणे बातम्या

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

एअर इंडियाच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संताप; देशभर आंदोलनाची ठिणगी

आझाद मैदानात धरणे आंदोलन; सिटूकडून जाहीर पाठिंबा मुंबई : प्रतिनिधी एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्व्हिस लिमिटेड (AIESL) मध्ये कार्यरत हजारो फिक्स्ड टर्म एम्प्लॉईज (FTE) कर्मचाऱ्यांचा संताप आता...

शेअर ट्रेडिंग फसवणुकीत 53 वर्षीय कोथरूड रहिवासी 71 लाखांचे नुकसान

पुणे : एका 53 वर्षीय व्यक्तीने, ज्याने एका IT फर्ममध्ये काम केले होते आणि अलीकडेच स्वेच्छानिवृत्तीची निवड केली होती, कथितपणे 71.20 लाख...

AFMS कृत्रिम अवयव केंद्राचे रूपांतर अंगविच्छेदन करणाऱ्यांसाठी आंतरराष्ट्रीय पुनर्वसन केंद्रात करणार: DGAFMS | पुणे...

कृत्रिम अवयव केंद्र कृत्रिम अवयव केंद्राने विविध कृत्रिम अवयव प्रदर्शित केले. केंद्राला आयएसओ प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले. सशस्त्र दलातील ALC ही एकमेव वैद्यकीय...

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

error: Content is protected !!