Homeताज्या बातम्याम्हाडामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा...

म्हाडामध्ये अभियंता दिन उत्साहात साजरा…

“आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात स्किल अपग्रेडेशन हीच यशाची गुरुकिल्ली” – संजीव जयस्वाल

मुंबई, दि. १७ : मंगेश म्हात्रे

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) तर्फे भारतरत्न अभियंता सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी अभियंत्यांना उद्देशून मार्गदर्शन केले.

“आधुनिक तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) यामध्ये होत असलेली झपाट्याची प्रगती हे आव्हान आहे. अशा काळात अभियंत्यांनी कौशल्य वृद्धी आणि वैयक्तिक प्रगती यावर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. टीमवर्क व कार्यक्षमता हीच यशाची खरी गुरुकिल्ली आहे. म्हाडा आज राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित झाले असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकिक मिळविण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे,” असे आवाहन श्री. जयस्वाल यांनी केले.

या कार्यक्रमाला मुंबई इमारत सुधार व पुनर्विकास मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद शंभरकर, मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर, म्हाडाचे मुख्य अभियंता धीरजकुमार पंदिरकर, महेशकुमार जेसवाणी, ननावरे तसेच उपमुख्य अभियंता राकेश गावीत उपस्थित होते. याशिवाय म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखेडे, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे मुख्य अधिकारी सतीश भारतीय यांच्यासह म्हाडाचे अनेक अभियंते या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी म्हाडामधील पदोन्नती प्राप्त अभियंत्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच म्हाडाचे अभियंता महादेव शितोळे लिखित “जगभरातील भूकंप : स्वरूप, भ्रम आणि वास्तव” या पुस्तकाचे प्रकाशन जयस्वाल यांच्या हस्ते झाले. “भूकंपाच्या वैज्ञानिक कारणांचा अभ्यास व त्याविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल,” असे त्यांनी यावेळी नमूद केले.

कार्यक्रमादरम्यान एलबी-डब्ल्यूएसपीचे सहाय्यक निवासी अभियंता विश्वास चिंचोरे यांनी “मुंबई-पुणे दुतगती महामार्गावरील मिसिंग लिंक प्रकल्प” या विषयावर व्याख्यान दिले. तर जीवनविद्या मिशनचे उपदेशक प्रल्हाद वामनराव पै यांनी “ताण-तणाव व्यवस्थापन व काम-जीवन समतोल” या विषयावर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

म्हाडाच्या २ हजार ६४० घरांसाठी ७८ हजारांहून अधिक अर्ज; कोणाचं नशीब फळफळणार? ‘या’ दिवशी...

मुंबई -मंगेश म्हात्रे म्हाडाच्या २६४० घरांसाठी अर्ज करणाऱ्यांनी या सोडतीला अर्जदारांनी कमाल प्रतिसाद दिला असून, आता तब्बल ७८ हजार ९७६ अर्ज दाखल झाले आहेत....

कोपरगावात इंधन टंचाई; पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

कोपरगाव : विजय जावरे कोपरगाव शहरासह तालुक्यात सध्या पेट्रोल व डिझेलच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील विविध पेट्रोल पंपांवर भरउन्हात वाहनांच्या...

error: Content is protected !!