Homeताज्या बातम्याशिर्डी बायपास, आहिल्यानगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोडी;  अपघातांचे प्रमाण...

शिर्डी बायपास, आहिल्यानगर-मनमाड महामार्गावर वाहतूक कोडी;  अपघातांचे प्रमाण वाढले

कोपरगाव,दि.२१ : दिलीप गायकवाड

शिर्डी, कोपरगाव, आहिल्यानगर-मनमाड महामार्गावर गेल्या आठवडाभरात झालेल्या जोरदार पावसामुळे रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचल्याने व मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

सावळी विहार, समृद्धी महामार्ग सर्कल, तिनचारी, पुणतांबे फाटा या परिसरातील रस्त्यांची परिस्थिती सर्वाधिक बिकट असून, वाहने चालवताना चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. बेटनाका परिसरात अनेक वाहनांचे इंजिन खराब झाल्याचे दिसून आले. त्यात भर म्हणून गोदावरी नदीवरील पुलाचे काम अद्याप अपूर्ण असल्याने वाहतूक कोडी अधिकच तीव्र झाली आहेत.

साईबाबा कॉर्नर ते येवला नाका या दरम्यान रस्त्याचा सिमेंट रस्ता बनवला असला तरी बाजूने भराव न झाल्याने वाहने वारंवार खाली घसरून अपघात घडत आहेत. पुणतांबे फाटा, जगताप पेट्रोल पंप, भाबड वस्ती, जुनी गंगा, जंगदबा माता मंदिर या भागांत झालेल्या अपघातांत काही नागरिकांचा जागीच मृत्यू झाला आहे. अशीच अवस्था बेटनाका, शुक्राचार्य मंदिर परिसर, कातकडे पेट्रोल पंप ते कांचनवाडी नाका दरम्यान दिसून येते.

वाहतूक ठप्प झाल्यामुळे अनेकवेळा प्रवाशांना रात्री रस्त्यातच थांबावे लागते. या वेळी स्थानिक लोकांकडून वाहनचालकांची लूट किंवा अन्य प्रकार घडतात, अशीही तक्रार चालकांनी केली आहे.

याबाबत बहुजन शक्ती न्यूजशी बोलताना वाहनचालकांनी शासनाने तातडीने या महामार्गाच्या दुरुस्तीसाठी पावले उचलावीत, तसेच रात्रीच्या वेळी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करून प्रवाशांची सुरक्षितता सुनिश्चित करावी, अशी मागणी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!