शिर्डी, दि. ४ :चंद्रकांत जोर्वेकर
शिर्डी येथील शासकीय गेस्ट हाऊस येथे शिवसेना (एकनाथ शिंदे गट) ची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीदरम्यान शिर्डी लोकसभा मतदारसंघातील अनेक नामवंत कार्यकर्त्यांनी शिवसेना (ए.एस) मध्ये जाहीर प्रवेश केला.
या कार्यक्रमात श्रीमती लक्ष्मीबाई माधव आढाव, अनंता आढाव, मंगेश दोडे यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. हा पक्षप्रवेश शिवसेना (ए.एस) आहिल्यानगर सचिव तथा जिल्हा संपर्कप्रमुख मा. रामभाऊ रेपाळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, आमदार मा. खताळ व आमदार लंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमाला शिवसेनेचे अनेक पदाधिकारी आणि नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आहिल्यानगर जिल्हाप्रमुख नितीनभाऊ औताडे, मा. कमलाकर कोते, नेते सागर भैय्या बेग, महिला आघाडी जिल्हाप्रमुख विमलताई पुंडे, संपर्कप्रमुख सुरेखाताई गव्हाणे, उपजिल्हाप्रमुख मनीलजी नरोडे, समन्वयक शिवाजी राजे जाधव, युवासेना उप तालुका प्रमुख अमोल लोखंडे, महिला आघाडी शहरप्रमुख आरतीताई गाडे, शहरप्रमुख अक्षय जाधव, युवासेना शहरप्रमुख सनी गायकवाड यांचा सहभाग होता.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वीपणे पार पडावा यासाठी जिल्हा प्रसिद्ध प्रमुख सुनिल साळुके यांनी विशेष मेहनत घेतली. नवप्रवेशित कार्यकर्त्यांचा सत्कार करण्यात आला असून, आगामी काळात पक्षबळ वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे.




















