कोपरगाव, दि. २ : दीपक साटोटे
कोपरगाव शहरातील काहार समाज गणेश मंडळाच्या वतीने आज सत्यनारायण महापूजा, हरिनाम कीर्तन व महाप्रसादाचा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.
दरवर्षीप्रमाणे यंदाही काहार समाज गणेश मंडळाने गणेश मूर्तीची स्थापना करून दहाव्या दिवशी विसर्जनाची परंपरा जपली. यानिमित्ताने आयोजित महापूजेला व हरिनाम कीर्तनाला मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून दर्शन घेतले.
कार्यक्रमानंतर भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित असंख्य गणेश भक्तांनी प्रसादाचा लाभ घेतला. धार्मिक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमामुळे परिसरात श्रद्धा, भक्ती आणि ऐक्याची भावना अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.




















