Homeउद्योगआता कामगारांना ९ ऐवजी १२ तास काम..

आता कामगारांना ९ ऐवजी १२ तास काम..

कारखाने अधिनियम दुरुस्तीला मंत्रिमंडळाची मंजुरी – ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, दि. ३ : अजय मगरे

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत कारखाने अधिनियम, १९४८ मधील काही महत्त्वपूर्ण तरतुदींमध्ये बदल करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या दुरुस्तीमुळे कामगारांच्या कामकाजाच्या वेळेत व ओव्हरटाईमच्या नियमांत बदल होणार असून उद्योग क्षेत्रातील नियम अधिक सुलभ व पारदर्शक होतील, अशी माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, “कामगारांच्या हिताचा विचार करून तसेच उद्योग क्षेत्राला अधिक लवचिकता मिळावी म्हणून या दुरुस्त्या करण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे यासाठी मी आभार मानतो.”

दुरुस्तीतील मुख्य मुद्दे :

कलम ५४ : दिवसाला कामकाजाची मर्यादा ९ तासांवरून १२ तासांपर्यंत वाढ.

कलम ५५ : विश्रांती कालावधीमध्ये बदल – ५ तासांनंतर ३० मिनिटे, तसेच ६ तासांनंतर आणखी ३० मिनिटे विश्रांती.

कलम ५६ : आठवड्याचे कामकाजाचे तास ४८ तासांवरून ६० तासांपर्यंत वाढ.

कलम ६५ : ओव्हरटाईमची मर्यादा ११५ तासांवरून १४४ तासांपर्यंत वाढ.

शासन मान्यतेशिवाय कारखान्यांना परस्पर वेळेतील बदल करण्यास परवानगी नाही.

आठवड्यातील ४८ तासांचे बंधन कायम राहणार.

मंत्री फुंडकर यांनी स्पष्ट केले की, जास्तीचे काम घेतल्यास त्यासाठी पुरेपूर मोबदला व पगारी सुट्या देणे बंधनकारक असेल.

केंद्र सरकारच्या Ease of Doing Business धोरणाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या या दुरुस्त्या उद्योग व कामगार दोघांसाठीही महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. “यामुळे उद्योग क्षेत्राला लवचिकता मिळेल, तर कामगारांसाठी पारदर्शक आणि नियोजित वातावरण निर्माण होईल,” असे फुंडकर यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!