Homeताज्या बातम्याठाणे–पुणे–नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

ठाणे–पुणे–नागपूर मेट्रो प्रकल्पांसाठी कर्ज घेण्यास मंत्रिमंडळाची मान्यता

मुंबई, दि. ३ : अजय मगरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुणे आणि नागपूर मेट्रो प्रकल्पांच्या विस्तारीत टप्प्यांसाठी आवश्यक कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली.

या निर्णयानुसार ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पुण्यातील पिंपरी-चिंचवड ते निगडी, स्वारगेट ते कात्रज, वनाज ते चांदणी चौक, रामवाडी ते वाघोली (विठ्ठलवाडी) या मार्गिका तसेच पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला–स्वारगेट–हडपसर–खराडी) आणि नळ स्टॉप वारजे–माणिकबाग (उपमार्गिका) या प्रकल्पांसाठी तसेच नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा–२ साठी आवश्यक निधी उभारणीसाठी राज्य शासनाने पुढाकार घेतला आहे.

यापूर्वीच या सर्व मेट्रो प्रकल्पांना मान्यता मिळाली होती. आजच्या निर्णयातून या प्रकल्पांसाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी शासनाने स्वीकारली असून त्यासाठी आवश्यक करार करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

या प्रकल्पांसाठी द्वीपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्था किंवा अन्य बँकांकडून सुलभ व्याजदरावर कर्ज घेण्यात येईल. त्याची मुद्दल, व्याज आणि शुल्क यांची परतफेड संबंधित प्रकल्पांना करावी लागणार आहे. आवश्यकतेनुसार राज्य शासन हमी देखील देणार आहे.

राज्यातील मेट्रो जाळे अधिक सशक्त करण्यासाठीचा हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा ठरणार असून, ठाणे, पुणे आणि नागपूरकरांना आगामी काळात अधिक सुलभ, जलद व सुरक्षित प्रवासाचा लाभ होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्नीने जीवन संपवल्यानंतर तांत्रिकाविरुद्ध एफआयआर. पुणे बातम्या

पुणे : वाघोली येथील त्यांच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये शुक्रवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास पत्नी पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने वाघोली पोलिसांनी एका तांत्रिकाविरुद्ध (३९)...

“घर मिळणार म्हणत 48 लाखांचा गंडा! श्रीनिवास मिल प्रकरणात दलालांचा मोठा खेळ उघड”

श्रीनिवास मिलमध्ये गिरणी कामगाराचे घर दाखवून लाखोंची लूट; सहा दलालांवर गुन्हा दाखल मुंबई : मंगेश म्हात्रे लोअर परेल येथील श्रीनिवास मिल परिसरात गिरणी कामगाराचे घर मिळवून...

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्याला ट्रॅफिक कॉन्स्टेबलकडून ५० हजारांची खंडणी मागितली

पुणे : वाहतूक हवालदाराला ब्लॅकमेल करून ५० हजार रुपयांची मागणी केल्याप्रकरणी शहरातील एका खासगी महाविद्यालयातील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्याला (१९) वाकड पोलिसांनी गुरुवारी नियमित तपासणीदरम्यान अटक...

प्रज्ञा फाऊंडेशनकडून डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना वही-पेन वाटप

ठाणे : अजय मगरे प्रज्ञा फाऊंडेशन व बहुजन शक्ती सामाजिक संस्थेच्या वतीने विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त तसेच ठाण्यातील सामाजिक संस्था 'प्रज्ञा...

IAF जेटच्या ‘हार्ड लँडिंग’ घटनेनंतर पुणे विमानतळ पुन्हा सुरू झाले. पुणे बातम्या

पुणे: भारतीय हवाई दलाच्या विमानाचा समावेश असलेल्या घटनेमुळे काही तासांच्या व्यत्ययानंतर, शनिवारी सकाळी पुणे विमानतळावरील कामकाज पुन्हा सुरू झाले, अधिकाऱ्यांनी धावपट्टी पूर्ववत...

error: Content is protected !!