Homeताज्या बातम्यानांदर (ता. पैठण) गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला; खोलीकरणामुळे गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण

नांदर (ता. पैठण) गावाचा पाण्याचा प्रश्न सुटला; खोलीकरणामुळे गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण

नाम फाउंडेशनच्या प्रयत्नांना यश; विरभद्रा नदीचे खोलीकरण फलदायी ठरले

पैठण, दि. २८ : प्रतिनिधी

पैठण तालुक्यातील मौजे नांदर येथे पिण्याच्या पाण्याचा व सांडपाण्याचा दीर्घकालीन प्रश्न अखेर सुटला आहे. नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून सुरू असलेल्या विरभद्रा नदीच्या खोलीकरणाच्या कामामुळे गावकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, गावात आनंदाचे वातावरण आहे.

सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे खोलीकरण क्षेत्रात पाणी साचले होते, परंतु यामुळे पाण्याचा नैसर्गिक साठा वाढल्याने आगामी काळात पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि सांडपाण्याचा निचरा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

गावातील पाण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून कायम होता. याआधी, साल २०१५ मध्ये बजाज फाउंडेशनच्या माध्यमातून दावरवाडी ते नांदर दरम्यान विरभद्रा नदीचे खोलीकरण करण्यात आले होते. त्या कामामुळेही परिसरातील पाणीसाठ्यात वाढ झाली होती.

नवीन सुरू असलेल्या खोलीकरणामुळे नांदरसह कौंदर, कुतुबखेडा, वडगाव, ब्राह्मगाव या शेजारील गावांनाही शेतीसाठी आवश्यक असा पाण्याचा पुरवठा सुयोग्यरित्या मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

या कामाबाबत किशोर पाटील तांगडे (शेतकरी अभ्यासक, नाम फाऊंडेशन, पुणे) यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले, “या खोलीकरणामुळे नांदर, दावरवाडी व आजुबाजूच्या गावांना पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक पाणीपुरवठा होणार असून, संपूर्ण परिसरातील जलसंपत्तीचा प्रभावी उपयोग होईल.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!