आहिल्यानगर,दि.३० ( दिलीप गायकवाड )
बँकिंग नियमन कायद्यातील संचालकांच्या पात्रता व कार्यकाळाबाबत करण्यात आलेल्या नव्या तरतुदींमुळे सहकारी बँकिंग क्षेत्रावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने या अन्यायकारक तरतुदींविरोधात संसदेत ठोस आवाज उठवू, असे आश्वासन खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.

अहमदनगर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन मर्यादित यांच्या वतीने कोपरगांव , पीपल्स बँक हॉल येथे शनिवारी (दि. २८) आयोजित बैठक झाली त्यावेळीस त्यांना निवेदन देण्यात आले. निवदेन मध्ये उल्लेखीली बँकिंग नियमन कायद्यातील नव्या तरतुदींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीत उपस्थितांनी सांगितले की, संचालकांच्या पात्रता व कार्यकाळासंबंधी करण्यात आलेल्या बदलांमुळे विशेषतः सहकारी बँकांना मोठा फटका बसण्याची भीती आहे.
महाराष्ट्रातील सुमारे ८० टक्के सहकारी बँकांवर या निर्णयाचा परिणाम होऊ शकतो आणि त्याचा थेट परिणाम ग्रामीण अर्थव्यवस्थेवर होण्याची शक्यता आहे.
असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा यांनी खासदार वाकचौरे यांच्यासमोर ही बाब मांडत संबंधित तरतुदींमध्ये तातडीने बदल करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत खासदार वाकचौरे यांनी संसदेत हा मुद्दा मांडून सहकारी बँकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.
यावेळी ज्येष्ठ संचालक कैलास शेठ ठोळे यांनीही या तरतुदी बँकिंग क्षेत्रासाठी धोकादायक ठरू शकतात, असे मत व्यक्त करत त्या तत्काळ रद्द करण्याची मागणी केली.
बैठकीस अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे चेअरमन सत्येन मुंदडा, कोपरगाव तालुका पीपल्स बँकेचे चेअरमन सुनील बंब, कैलास शेठ ठोळे, धरमशेठ बागरेचा, नीरज काले, वसंतराव आव्हाड, अॅड. संजय भोकरे, भाऊसाहेब लोहकरे, प्रतिभाताई शिलेदार, पीपल्स बँकेचे मॅनेजर
जितेंद्र छाजेड, गौतम बँकेचे खेमनर आदी संचालक, पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.




















