पैठण,दि.३१ (अजय मगरे )
पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र नांदर येथे रेणुका देवी यात्रा व हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर साक्षी बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत गरजू रुग्णांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवाजी नागरी बँकेचे अध्यक्ष रविंद्र (दादा) काळे यांच्या हस्ते होणार असून, यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
संस्थेचे अध्यक्ष प्रा. संदीप काळे, तसेच समन्वयक आकाश तर्हाळ व राहुल काळे यांनी नागरिकांना आवाहन करताना, “रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून, या शिबिरात सहभागी होऊन समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडावी,” असे सांगितले.
या उपक्रमामुळे गरजू रुग्णांना जीवनदान मिळण्यास मदत होणार असून, समाजात रक्तदानाबाबत जनजागृती निर्माण होण्यासही मोठा हातभार लागणार आहे.




















