Homeताज्या बातम्याभाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा; ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा

भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा; ठाणेकरांना वाहतूक कोंडीपासून दिलासा

ठाणे, दि.१४ (प्रतिनिधी)

ठाणे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत ऐतिहासिक टप्पा गाठत आज घोडबंदरवरील अत्यंत महत्त्वाच्या भाईंदरपाडा उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा पार पडला. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि एमएमआरडीएचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालेल्या या सोहळ्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते.

या उड्डाणपुलाच्या बांधकामाची खासियत म्हणजे मेट्रो लाईन ४ व ४ए च्या व्हायाडक्टवर त्याची उभारणी, ज्यामुळे जागेचा उत्कृष्ट वापर साधत रस्ता आणि मेट्रो यांच्यातील समन्वय साधला गेला आहे. भविष्यात मेट्रो सुरू झाल्यावर या भागातील रहिवाशांना सहज आणि जलद सेवा उपलब्ध होणार आहे.

हा प्रकल्प ठाणे, भिवंडी, नवी मुंबई, जेएनपीटीसह बोरिवली, वसई-विरार आणि गुजरातकडे जाणाऱ्या मार्गासाठी वाहतूक सुरळीत करण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

प्रकल्प वैशिष्ट्ये: एकूण रॅम्प लांबी: ६०१ मीटर ,२+२ मार्गिका: प्रत्येकी ७.५ मीटर,भुयारी मार्ग: लांबी २०.४ मी, रुंदी २९.७मी, वाहन घनता: अंदाजे ७३,३३३ पीसीयू फायदे:गुजरात ते जेएनपीटी दरम्यानच्या जड वाहन वाहतुकीस चालना,गायमुख-वाघबिल दरम्यानची वाहतूक कोंडी लक्षणीयरीत्या कमी,प्रवासाचा वेळ वाचून सरासरी वेगात वाढ, स्थानिकांसाठी स्वतंत्र भुयारी मार्गामुळे सुलभ वाहतूक

ठाणेकरांसाठी ही केवळ वाहतूक सुधारणा नसून जीवनशैलीतील सकारात्मक बदल असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केले. तर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी या प्रकल्पामुळे आर्थिक आणि औद्योगिक हालचालींना चालना मिळणार असल्याचे सांगितले.

हा प्रकल्प ठाणेच्या वाढत्या वाहतूक गरजांना उत्तर देणारा ठरून नागरिकांच्या दैनंदिन जीवनात खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवून आणेल, असे चित्र आजच्या लोकार्पण सोहळ्यातून स्पष्ट झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!