Homeताज्या बातम्याठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो ! मेट्रो लाईन-9 च्या ट्रायल रनला सुरुवात.

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो ! मेट्रो लाईन-9 च्या ट्रायल रनला सुरुवात.

मुंबई, दि.१४ ( प्रतिनिधी )

ठाणे जिल्ह्यातील पहिली मेट्रो सेवा आज प्रत्यक्ष ट्रॅकवर उतरली. मिरा-भाईंदर ते दहिसर (पूर्व) या दरम्यानच्या मेट्रो लाईन-९ च्या पहिल्या टप्प्याच्या ट्रायल रनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या हस्ते औपचारिक सुरुवात झाली. यावेळी विविध मंत्री, आमदार, अधिकारी आणि एमएमआरडीएचे वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते.

४.४ किमी लांबीच्या या टप्प्यात चार स्थानकांचा समावेश आहे – दहिसर (पूर्व), पांडुरंगवाडी, मिरागाव आणि काशिगाव. विशेष म्हणजे, ही मेट्रो लाईन मुंबईतील पहिला “डबल डेकर” प्रकल्प असून, मेट्रो मार्ग आणि उड्डाणपूल एकाच संरचनेत उभारले आहेत.

मेट्रो लाईन-९ मिरा-भाईंदरकरांना पश्चिम उपनगर, अंधेरी, घाटकोपर आणि CSMIA आंतरराष्ट्रीय विमानतळाशी थेट जोडेल. तसेच भविष्यात वसई-विरार व ठाणेशी देखील दळणवळण अधिक सुलभ होणार आहे. वाहतूक कोंडी आणि प्रदूषणात लक्षणीय घट ऊर्जा बचतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुटसुटीत, वेळेत आणि आरामदायक प्रवास.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी सांगितले की, “ही मेट्रो लाईन मिरा-भाईंदरच्या दृष्टीने परिवर्तन घडवणारी ठरेल. २०२७ पर्यंत संपूर्ण मेट्रो नेटवर्कचा वेगाने विस्तार करण्यात येईल.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, “या प्रकल्पामुळे ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांची मेट्रोशी थेट जोडणी होईल. दरवर्षी ५० ते ६० किमी नवीन मेट्रो सुरू करण्याचा आमचा मानस आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल....

पुणे : हवेली तालुक्यातील अष्टापूर येथील २६ वर्षीय तरुणाला राज्य उत्पादन शुल्क विभागात नोकरी देण्याचे आमिष दाखवून २५ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या...

तंबाखूच्या पुड्यांवरील धार्मिक प्रतीकांच्या गैरवापराविरोधात कोपरगावात आंदोलन; प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण स्थगित

प्रकरण FDA आणि ट्रेडमार्क कार्यालयाकडे वर्ग; ठोस कारवाई न झाल्यास पुन्हा तीव्र आंदोलनाचा इशारा कोपरगाव | प्रतिनिधी तंबाखूच्या पुड्यांवर पंढरपूर, 'ओम' आणि 'गाय' यांसारख्या धार्मिक व...

पुणे FDA ने अस्वच्छतेच्या बाबतीत 12 भोजनालय, रेस्टॉरंट आणि बेकरीचा परवाना निलंबित केला आहे....

रेस्टॉरंटमध्ये अस्वच्छ परिस्थिती पुणे: अन्न आणि औषध प्रशासन (FDA) ने संपूर्ण प्रदेशातील 12 भोजनालये, रेस्टॉरंट्स आणि बेकरींचे परवाने आणि नोंदणी निलंबित केली असून...

हजारे यांनी पंतप्रधानांना पत्र लिहून प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दिला, विद्यार्थ्यांच्या निदर्शनांदरम्यान पोलिसांची...

पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलेल्या पत्रात अण्णा हजारे म्हणाले की, सरकारने आंदोलकांशी संवाद साधून संवाद साधावा पुणे : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी...

पुण्याच्या आयटी कॉरिडॉरमध्ये हिंजवडी, वाकड ड्राईव्ह होम डिमांड | पुणे बातम्या

पुणे : हिंजवडी, वाकड, रावेत, किवळे आणि महाळुंगे या शहराच्या आयटी कॉरिडॉरचा एक मोठा भाग एकूणच निवासी बाजारपेठेत वाढ करत आहे.गेरा रेसिडेन्शिअल...

error: Content is protected !!