Homeताज्या बातम्याम्हाडाची गिरणी कामगारांना सूचना... कोन पनवेल मधील १३०९...

म्हाडाची गिरणी कामगारांना सूचना… कोन पनवेल मधील १३०९ घरांचा ताबा घ्या… अन्यथा प्रतिक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी…

मुंबई, दि. ६ ऑगस्ट : मंगेश म्हात्रे

म्हाडाच्या मुंबई मंडळामार्फत डिसेंबर २०१६ मध्ये कोन (पनवेल) येथे गिरणी कामगारांसाठी २४१७ घरांची सोडत काढण्यात आली होती. मात्र, तब्बल १३०९ यशस्वी लाभार्थ्यांनी आजतागायत सदनिकांचा ताबा घेतलेला नाही.

या पार्श्वभूमीवर म्हाडाने यशस्वी लाभार्थ्यांना अखेरची संधी देताना, ७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत ताबा घेण्याचे आवाहन केले आहे. या ३० दिवसांच्या कालावधीत संबंधित लाभार्थ्यांनी विहित कागदपत्रांसह उपमुख्य अधिकारी (गिरणी), मुंबई मंडळ, कक्ष क्र. २०४, पहिला मजला येथे प्रत्यक्ष संपर्क साधावा.

प्रत्यक्ष येणे शक्य नसलेल्या लाभार्थ्यांसाठी ई-मेल सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, panvelkondoc.mhada@gmail.com या पत्त्यावर आवश्यक माहिती आणि कागदपत्रे पाठवता येतील. ही सुविधा केवळ कोन पनवेल सोडतीतील यशस्वी लाभार्थ्यांसाठीच आहे.

तब्बल आठ वर्षांनंतरही सदनिकांचा ताबा न घेतलेल्या लाभार्थ्यांना म्हाडाने स्पष्ट इशारा दिला आहे की, या मुदतीत ताबा न घेतल्यास प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांना संधी दिली जाईल. भविष्यात कोणतीही विनंती स्वीकारली जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका म्हाडाने घेतली आहे.

ताबा न घेतलेल्या लाभार्थ्यांची यादी म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://mhada.gov.in) प्रसिद्ध करण्यात आली आहे. गिरणी कामगार संघटनांनी आणि संबंधित नातेवाइकांनी हे आवाहन लाभार्थ्यांपर्यंत पोहचवावे, असे आवाहनही म्हाडाने केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

राज्य मोठ्या प्रमाणात डिझेल वापरकर्त्यांना थेट OMCs कडून खरेदी करण्यास सांगतो, किरकोळ पंप नाही....

इंधन केंद्रांसाठी, वाहनांना प्रथम प्राधान्य दिले जाते पुणे : शुक्रवारी जारी केलेल्या राज्य सरकारच्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की मोठ्या प्रमाणात इंधनाची...

प्रसाद नगरकर: फिटनेस हा ९० दिवसांचा प्रकल्प नाही. ती आयुष्यभराची बांधिलकी आहे : प्रसाद...

अशा युगात जेथे जलद निराकरणे फिटनेस संस्कृतीवर प्रभुत्व मिळवतात आणि नाट्यमय परिवर्तने सोशल मीडिया टाइमलाइन भरतात, संयम आणि दीर्घकालीन वचनबद्धतेमध्ये रुजलेल्या कथा...

ठाणे-पालघरमध्ये विजयाचे बिनविरोध फाटक उघडले : एकनाथ शिंदे

ठाणे : अजय मगरे ठाणे-पालघर विधानपरिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड झाल्याने महायुतीच्या विजयाचे फाटक उघडले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले....

पीएमसी संचलित वैद्यकीय महाविद्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाच्या तक्रारींबाबत चौकशीचे आदेश दिले आहेत

पीएमसी संचालित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी मेडिकल कॉलेज (बीएव्हीएमसी) पुणे : पीएमसी संचालित भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय (बीएव्हीएमसी) च्या किमान चार महिला...

‘राजीनामा देण्यासाठी दबाव टाकण्यात आला’: धर्मांतर, कामाच्या ठिकाणी भेदभाव केल्याचा आरोप महिलेने केल्यानंतर पुणे...

एका तंत्रज्ञान कंपनीच्या एका माजी कर्मचाऱ्याने धार्मिक छळ, कामाच्या ठिकाणी भेदभाव आणि राजीनामा देण्याचे आरोप केले आहेत, त्यानंतर पुण्यातील हिंजवडी पोलिसांकडे तक्रार दाखल...

error: Content is protected !!