Homeताज्या बातम्यारामदास कांबळे शिंदे गटात;  प्रतीक्षा नगर वार्ड-173 मधील...

रामदास कांबळे शिंदे गटात;  प्रतीक्षा नगर वार्ड-173 मधील समीकरणांमध्ये उलथापालथ..

केळुसकर महायुती धर्म पाळणार की वेगळी वाट धरणार?

मुंबई, दि.१९ : मंगेश म्हात्रे

प्रतीक्षा नगर परिसरातील माजी नगरसेवक रामदास कांबळे यांच्या शिंदे गट प्रवेशाने वार्ड क्रमांक 173 मध्ये राजकीय पटलावर नवे समीकरण निर्माण झाले आहे. महायुतीतील लोकसभा आणि विधानसभेच्या वाटपाच्या फॉर्मुल्यानुसार या वार्डची जागा शिवसेना (शिंदे गट) ला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे भाजप मंडळ अध्यक्ष दत्ता केळुसकर आणि 2017 चे भाजप उमेदवार विजय पगारे यांच्यासमोर कठीण प्रश्न उभा ठाकला आहे—“महायुती धर्म पाळावा की स्वतंत्र मार्ग स्वीकारावा?”

प्रतीक्षा नगर हा मध्यमवर्गीय व बहुसंख्य मराठी मतदारसंघ असून, येथे शिवसेनेचा वर्चस्वाचा इतिहास 1992 पासून कायम राहिला आहे. शाखाप्रमुख प्रकाश वाघधरे यांच्या निधनानंतर शिवसेनेला अनेक धक्के बसले. सुनील शेट्ये, दत्ता केळुसकर यांच्यासह काही नेत्यांनी पक्षा बाहेर पडून

इतर राजकीय पर्याय स्वीकारले. 2023 मध्ये माजी नगरसेवक मंगेश सातमकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला, तर 2024 च्या लोकसभा निवडणुकीत अनिल देसाई खासदार निवडून आल्याने उबाठा गटाला दिलासा मिळाला.

या पार्श्वभूमीवर रामदास कांबळे यांच्या प्रवेशाने शिवसेना (शिंदे गट) ने प्रतीक्षा नगरमध्ये जोरदार मोहरा उभा केला आहे. शांत व संयमी वृत्तीमुळे स्थानिक सहानुभूती असलेले कांबळे शिंदे गटात सामील झाल्यानंतर, ही सहानुभूती भाजपकडे झुकत असल्याचे चित्र दिसते. त्यामुळे भाजप नेते दत्ता केळुसकर यांच्या हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, 2018 च्या पोटनिवडणुकीत तब्बल ५५०० मते घेणारे सुनील शेट्ये, मनसेचे स्थानिक शाखाध्यक्ष लवू नर, तसेच माजी नगरसेविका प्रणिता वाघधरे यांची भूमिका या आगामी महापालिका निवडणुकीत निर्णायक ठरणार आहे.

थोडक्यात, कांबळे यांच्या प्रवेशामुळे भाजपसाठी ही डोकेदुखी ठरली असली तरी ते महायुती धर्म निभावतील की स्वतंत्र लढतीचा पर्याय स्वीकारतील, यावरच वार्ड क्रमांक 173 चे राजकीय भवितव्य ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!