Homeताज्या बातम्याअभिमान गावाचा, सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचा! गौरव सोहळा उत्साहात संपन्न..

अभिमान गावाचा, सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचा! गौरव सोहळा उत्साहात संपन्न..

पैठण,दि.२६.(अभिजीत सोनवणे )

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली आणि संत एकनाथ महाराज यांच्या पावन भूमीवर, वीरभद्रा नदीच्या तीरावर वसलेले श्री क्षेत्र रेणुकादेवीचे तीर्थक्षेत्र — नांदर — हे गाव अनेक मान्यवर व्यक्तींचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते. शिक्षण, समाजकारण, सामाजिक कार्य, तसेच विविध क्षेत्रांत गावातील व्यक्तींनी आपले मोलाचे योगदान दिले आहे.

या गौरवशाली परंपरेला पुढे नेत “साक्षी बहुउद्देशीय सामाजिक सेवाभावी संस्था, नांदर” यांच्या वतीने “अभिमान गावाचा, सन्मान नांदरच्या भूमिपुत्रांचा” हा भव्य गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. संदीप पा. भुमरे (खासदार, छत्रपती संभाजीनगर) व मा. श्री. रवींद्र कुलकर्णी (कुलगुरू, मुंबई विद्यापीठ) यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. दिलीप स्वामी (जिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर), मा. श्री. अविनाश लोंढे (उपजिल्हाधिकारी, छत्रपती संभाजीनगर), मा. सौ. ज्योती पवार (तहसीलदार, पैठण), मा. श्री. एन. डी. कुलकर्णी (शल्य चिकित्सक) तसेच प्रमुख अतिथी म्हणून मा. श्री. रवींद्र काळे, मा. श्री. सुनील पाटील, मा. श्री. सचिन पंडित, आणि मा. प्रा. संतोष तांबे हे मान्यवर उपस्थित होते.

या सोहळ्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या नांदरच्या ८० युवक व युवतींचाही  सन्मानचिन्ह, व शाल श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाला गावकऱ्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.मा. प्रा. संतोष तांबे, प्रा.संदीप काळे, विजय औटे, संरपंच विजय गायकवाड, उपसंरपंच आसमान दादा काळे,माजी उपसंरपंच रेवणनाथ कर्डीले, सदस्य शिवाजी मगरे, प्रविण काळे,कचरु नाचन, दावरवाडी चे सरपंच ॲड डी.डी जाधव,शाम तांगडे, राजेंद्र वाघमोडे,कमलाकर एडके, बबन तुपे, यशवंत काळे, किशोर वैद्य, शिवाजी शिंदे, परमेश्वर शिंदे, प्रविण राऊत,अरविंद मिसाळ, अभिषेक जावळे, राहुल काळे,व गावातील युवक,महीला ज्येष्ठ नागरीक,आदी मान्यवर उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

नांदर ता पैठण येथे अंधश्रद्धा निर्मूलन व जादूटोणा विरोधी कायद्याबाबत जनजागृती शिबिर संपन्न

पैठण, दि.२१.(प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील नांदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दिनांक 20 जुलै 2026 रोजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, महाराष्ट्र शासन, सहाय्यक आयुक्त...

पुण्यात आंदोलकांची मोठी गर्दी, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

पुणे : झुरळ जनता पक्षाचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या नेतृत्वाखाली आणि नवोदित आणि कार्यकर्त्या सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ जंतरमंतर निदर्शनास एकता म्हणून...

पुरवठा कमी झाल्याने अंड्याच्या किमतीत वाढ होते, पोल्ट्री फीडची किंमत वाढते. पुणे बातम्या

घाऊक बाजारात अंड्याचा भाव 1 जुलैला 7.20 रुपये प्रति नग होता तो 20 जुलैला 7.80 रुपये झाला. पुणे: पोल्ट्री फीडचा वाढता खर्च, कडक...

कोपरगावात गटाराच्या कामात ‘धातुरमातुर’; ठेकेदाराच्या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे संताप मुख्याधिकारी व नगराध्यक्षांनी तातडीने चौकशी...

कोपरगाव : दिलीप गायकवाड कोपरगाव नगरपरिषद हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज रोडवरील गटाराच्या नूतनीकरणाच्या कामात मोठ्या प्रमाणावर हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचे...

या आठवड्यात पुणे, महाराष्ट्राच्या काही भागात पावसाचा जोर वाढेल: IMD

काही दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुणे आणि परिसरात पुनरागमन केले आहे. पुणे : 19 जुलै रोजी जारी करण्यात आलेल्या भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) बुलेटिननुसार,...

error: Content is protected !!