येवला, दि.२८ : ( अजय मगरे )
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्ता बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी महाराष्ट्रातील अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत देण्याची मागणी शासनाकडे केली.
कटारे म्हणाले की, “नुकत्याच झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभी पिके पाण्याखाली गेली असून, अनेक शेतजमिनी वाहून गेल्या आहेत. अशा स्थितीत शेतकऱ्यांना शासनाने त्वरित मदत करून दिलासा देणे अत्यावश्यक आहे.”
यावेळी असंख्य युवकांनी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात प्रवेश केला. राष्ट्रीय अध्यक्ष कटारे यांनी नवीन कार्यकर्त्यांना पक्षाच्या धोरणांची माहिती देत संघटनात्मक कामकाजाबाबत मार्गदर्शन केले.
या बैठकीत प्रदेश उपाध्यक्ष शांताराम बापू थोरे, युवा नेतृत्व महाराष्ट्र राज्य बिपिन कटारे, युवा संपर्कप्रमुख संतोष भाऊ राजगुरू, येवला युवा नेते तुषार वाघ, संभाजीनगर युवा जिल्हाध्यक्ष संदीप भाऊ गायकवाड, नवनिर्वाचित येवला तालुकाध्यक्ष अॅड. चंद्रकांत निकम, युवा नेते प्रशांत कटारे, जिल्हा नेते शिवाजीराव गायकवाड, जिल्हा उपाध्यक्ष मेघश्याम ठोंबरे, जिल्हा सरचिटणीस नानासाहेब केदारे, निफाड नेते संदीप बनसोडे, येवला तालुका उपाध्यक्ष बबन वाघ, प्रसिद्धी प्रमुख वाल्मीक भाऊ खरात, गौरव मोहन आदी मान्यवर उपस्थित होते.




















