Homeताज्या बातम्याशिक्षक हक्कांसाठी लढणारे योद्धा ' मते गुरुजी ' काळाच्या आड…

शिक्षक हक्कांसाठी लढणारे योद्धा ‘ मते गुरुजी ‘ काळाच्या आड…

कोपरगाव, दि.२८ : दिलीप गायकवाड

कोपरगाव शहरातील ज्येष्ठ शिक्षक नेते व समाजकारणात आपली छाप उमटवणारे स्व. माधवराव गोपाळा पा. मते (मते गुरुजी) यांचे ( दि.२०) वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षकवर्गासह संपूर्ण कोपरगावात शोककळा पसरली आहे.

“मते गुरुजी” या नावाने प्रसिद्ध असलेल्या त्यांचा अध्यापन प्रवास शिर्डी, वेलापूर, पाथरे, कोपरगाव नगरपालिका शाळा (कालेमळा व सराफ बाजार) येथे झाला. असंख्य विद्यार्थ्यांचे जीवन घडवणारे हे कठोर परिश्रमी शिक्षक कोपरगाव बेट येथून मुख्याध्यापक पदावरून निवृत्त झाले.त्यांचा स्वभाव शांत, संयमी असला तरी शिक्षकांच्या प्रश्नांवर त्यांनी नेहमीच ठाम आणि कणखर भूमिका घेतली. प्राथमिक शिक्षक संघाचे तब्बल १५ वर्षे ते शहराध्यक्ष राहिले.

१९७७ मधील संपूर्ण महाराष्ट्र शिक्षण आंदोलनात त्यांनी ५४ दिवस नेतृत्व करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला. शिक्षकांची पगारवाढ व मुख्याध्यापक पदांची भरती यासाठी त्यांनी कायदेशीर व संघटनात्मक लढा दिला. त्यामुळे त्यांना “शिक्षक हक्कांसाठी लढणारे योद्धा” म्हणून संपूर्ण राज्यात ओळख मिळाली.

उत्तम शिक्षक, प्रगतिशील शेतकरी व कायद्याचे जाणकार अभ्यासक म्हणून त्यांची ओळख होती. त्यांची पत्नी स्व. प्रयागाबाई या देखील आदर्श शिक्षिका होत्या. मुलं प्रमोद व महेश मते हे वडिलांच्या प्रेरणेने समाजकार्यात सक्रिय आहेत.
त्यांच्या निधनामुळे शिक्षकवर्ग, व्यापारी वर्ग व नागरिकांत हळहळ व्यक्त होत आहे.

“मोडेल पण वाकणार नाही” या वृत्तीने आयुष्य जगणाऱ्या स्व. मते गुरुजींना भावपूर्ण श्रद्धांजली – नारायण शेठ अग्रवाल, मो. ९८२२६३०३३०

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर-कोमकर टोळीत पुन्हा गँगवॉरचा भडका

पुण्यातील बालाजीनगरमध्ये भरदिवसा गोळीबार पुणे पुन्हा रक्तरंजित गँगवॉरने हादरलं! आंदेकर खून प्रकरणाच्या बदल्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार करत कोयत्याने सपासप वार करण्यात आल्याची थरारक घटना बालाजीनगर...

कडक शिस्तीचे अधिकारी” तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; आता FDA ची धुरा, 21 वर्षांत...

सहा सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या मुंबई : मंगेश म्हात्रे आपल्या कडक प्रशासन शैलीसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली करण्यात आली...

डिझेलचे उच्च दर निविदा नारळाच्या किमती वाढवतील

पुणे : कमी उपलब्धता आणि जास्त मागणी यामुळे या उन्हाळ्यात संपूर्ण शहरात नारळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. डिझेलच्या दरात नुकत्याच झालेल्या...

कारमध्ये लैंगिक छळ केल्याच्या वकिलाच्या तक्रारीनंतर चार जणांना अटक

प्रतिमा केवळ प्रातिनिधिक उद्देशासाठी वापरली जाते पुणे: रविवारी रात्री 11.30 च्या सुमारास कोरेगाव पार्क येथे एका कारमध्ये नंतर त्यांच्या दोन मित्रांसह आलेल्या दोन...

सर्वोत्कृष्ट निवेदक म्हणून अनिल काकुळते… लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानीत…

ठाणे : अजय मगरे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक, सरस्वती क्लासेसचे संस्थापक-अध्यक्ष तथा धमनार गावचे सुपुत्र अनिल काकुळते यांना “सर्वोत्कृष्ट निवेदक” म्हणून लोकहिंद गौरव राज्यस्तरीय पुरस्कार २०२६...

error: Content is protected !!