Homeताज्या बातम्याआता एसआरए'ची डिजिटल नजर.... मुंबईतील अवैध झोपड्यांवर एआयची नजर...

आता एसआरए’ची डिजिटल नजर…. मुंबईतील अवैध झोपड्यांवर एआयची नजर…

 मालवणीत प्रायोगिक तत्त्वावर योजना सुरू…

मुंबई, दि. ६ : मंगेश म्हात्रे

मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याच्या दिशेने राज्य सरकारने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली असून, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (एसआरए) आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) या आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अवैध झोपडपट्ट्यांवर लक्ष ठेवणार आहे.

शहरातील झपाट्याने वाढणाऱ्या झोपडपट्ट्यांमुळे नागरी प्रशासनावर ताण वाढत असून, कायदेशीर आणि अनधिकृत बांधकामांची ओळख पटवणे ही मोठी समस्या बनली आहे. या पार्श्वभूमीवर एसआरएने आता डिजिटल यंत्रणेकडे वळत, एआयचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या ही योजना मालवणी परिसरात प्रायोगिक तत्त्वावर राबवली जात असून, या भागातील झोपडपट्यांचे सर्वेक्षण, स्थानिक बदल, नव्याने उभ्या राहणाऱ्या झोपड्यांची माहिती आदी गोष्टी एआय प्रणालीद्वारे सतत नोंदवल्या जात आहेत. यामुळे प्रशासनाला तात्काळ आणि अचूक माहिती मिळते आणि वेळेवर हस्तक्षेप करून अनधिकृत बांधकामे थांबवणे शक्य होते.

प्राधिकरणाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एआय प्रणाली ड्रोन, सॅटेलाईट इमेजेस आणि रीअल टाइम डेटा अॅनालिसिस यांच्याच्या साहाय्याने कार्य करते. भविष्यात ही योजना मुंबईतील इतर संवेदनशील भागांमध्येही टप्प्याटप्प्याने लागू करण्याचा मानस आहे.

“एआयचा वापर केल्याने मानवी निरीक्षणाच्या मर्यादा ओलांडता येतील आणि अवैध बांधकामांवरील नियंत्रण अधिक प्रभावी होईल,” असे एसआरएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!