Homeताज्या बातम्याआधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाची सांगड; कोपरगावात ‘फार्मट्रेक’चा भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न.....

आधुनिक तंत्रज्ञान आणि कष्टाची सांगड; कोपरगावात ‘फार्मट्रेक’चा भव्य शेतकरी मेळावा उत्साहात संपन्न…..

सेंद्रिय शेती व प्रगत यांत्रिकीकरणाचा मंत्र; ‘शेतकरी ट्रॅक्टर’ येथे शेकडो शेतकऱ्यांची उपस्थिती

कोपरगाव : दिलीप गायकवाड

बदलत्या काळानुसार शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून श्रमांची बचत व उत्पादनवाढ साधणे ही काळाची गरज बनली आहे. याच उद्देशाने कोपरगाव येथील येवला रोडवरील ‘शेतकरी ट्रॅक्टर’ व ‘फार्मट्रेक’ कंपनीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेला भव्य शेतकरी मेळावा व परिसंवाद मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यास कोपरगावसह परिसरातील ग्रामीण भागातून शेकडो शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या मेळाव्यास फार्मट्रेक कंपनीचे दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र सेल्स अधिकारी भालचंद्र माने, रिजनल बिझनेस मॅनेजर रवींद्र कदम, झोनल मॅनेजर (फार्म पॉवर) अभिषेक कुमार, एरिया सर्व्हिस मॅनेजर संजय कुमावत, एरिया रिटेल मॅनेजर महेश पावशे, एरिया सेल्स मॅनेजर शुभम खेडकर तसेच प्रोजेक्ट सपोर्ट ऑफिसर प्रकाश जेट्टी यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी आधुनिक ट्रॅक्टर व कृषी अवजारांच्या साहाय्याने कमी वेळेत अधिकाधिक काम कसे करता येईल, याबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सखोल व तांत्रिक मार्गदर्शन करण्यात आले.

या मेळाव्याचे विशेष आकर्षण ठरले ते प्रगतशील शेतकरी उत्तम बादशाह (पुणे) यांचे मार्गदर्शन. त्यांनी सेंद्रिय खतांच्या वापरातून जमिनीचा पोत सुधारण्याचे महत्त्व सांगितले. तसेच पाण्याचा काटकसरीने व नियोजनबद्ध वापर करून विक्रमी उत्पादन कसे घेता येईल, याचे प्रात्यक्षिक अनुभव कथनातून मांडले. यावेळी आप्पासाहेब गाडे व हरिश्चंद्र गायकवाड यांनीही आपल्या शेतीतील यशस्वी अनुभव शेअर केले.

‘शेतकरी ट्रॅक्टर’चे सर्वेसर्वा वेदांत करपे यांच्या मार्गदर्शनाखाली भूषण वडांगळे, सागर गायकवाड व अनिकेत करपे यांनी या मेळाव्याचे नियोजन केले होते. फार्मट्रेक ट्रॅक्टरची ताकद, कार्यक्षमता व आधुनिक कृषी अवजारे पाहून शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन शोरूमचे सर्व्हिस मॅनेजर ग
णेश मोकाटे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार एरिया सेल्स मॅनेजर शुभम खेडकर यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी शोरूममधील सेल्स टीमने विशेष परिश्रम घेतले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!