Homeउद्योगएमएमआरडीए'चे प्रकल्पप्रमुख विक्रम कुमार यांची अटल सेतूच्या मार्गाची पाहणी; 

एमएमआरडीए’चे प्रकल्पप्रमुख विक्रम कुमार यांची अटल सेतूच्या मार्गाची पाहणी; 

कंत्राटदारास पाच दिवसांत दुरुस्तीस आदेश…

मुंबई, दि.१९ : प्रतिनिधी

गत वर्षी प्रवाशांच्या सेवेत आलेला अटल सेतूची किर कोळ झीज झाल्याचे निदर्शनास आले आहे. जोरदार पाऊस व अविरत वाहतुकीमुळे सेतूची झीज झाल्याचा दावा महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने केला आहे. एमएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त व प्रकल्प प्रमुख विक्रम कुमार यांनी आज अटल सेतूची पाहणी केली.

विक्रम कुमार यांनी आज सकाळी २२ किमी लांबीच्या संपूर्ण अटल सेतूची पाहणी केली.

या पाहणीत एमएमआरडीएच्या पथकाने नवी मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरील केवळ २ किमी पट्ट्यात (कि.मी. १४ ते १६ दरम्यान) काही ठिकाणी पृष्ठभागावर किरकोळ झीज झाल्याचे निदर्शनास आणले. सततचा जोरदार पाऊस आणि अविरत वाहतूक प्रवाह ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

त्यानुसार, कंत्राटदार देऊ–टाटा इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स यांना हा भाग पुढील पाच दिवसांत दुरुस्त करण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. वेळेत काम पूर्ण झाले नाही तर अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला.

एमएमआरडीने आतापर्यंत कंत्राटदारावर केलेल्या कारवाईत १ कोटी दंड आकारण्यात आला असून जानेवारी २०२६ मध्ये संपणारा डिफेक्ट लायबिलिटी पिरियड एका वर्षाने वाढविला.पावसाळ्यानंतर प्रभावित भाग पूर्णपणे नव्याने तयार करणे तेही कंत्राटदाराच्या स्वखर्चाने, डेंस बिट्युमिनस मॅकॅडम व ॲस्फाल्ट काँक्रीट चा वापर करून बनविणे. असे निर्देश देण्यात आले.

एमएमआरडीएच्या पथकाने स्पष्ट केले की, अटल सेतू रचनात्मकदृष्ट्या भक्कम व सुरक्षित आहे. या महत्त्वाच्या प्रकल्पाच्या गुणवत्तेची व विश्वासार्हतेची शाश्वती राखण्यासाठी वेळेवर कारवाई आणि कठोर देखरेख केली जाईल, अशी हमी प्रशासनाने नागरिकांना दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!