Homeताज्या बातम्याएसटीत लवकरच नोकरभरती – मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

एसटीत लवकरच नोकरभरती – मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

मुंबई, दि.१२ (अजय मगरे )

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात २५ हजार स्वमालकीच्या बसेस घेतल्या जाणार आहेत. या नव्या बसेसच्या संचालनासाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळाची आवश्यकता भासणार असल्याने लवकरच एसटीत नोकरभरती केली जाणार असल्याची माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली.

मंत्री सरनाईक म्हणाले, “सन २०२४ पर्यंत एसटीतील भरती प्रक्रियेवर उच्च न्यायालयाने बंदी घातली होती. मात्र, आता निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या आणि नव्या बसेसच्या गरजेनुसार चालक, वाहक व इतर पदांसाठी भरती आवश्यक ठरणार आहे.” संचालक मंडळाच्या ३०७ व्या बैठकीत या भरतीच्या ठरावाला मंजुरी देण्यात आली असून तो शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

अभियंत्यांच्या जागाही भरल्या जाणार

सध्या एसटीच्या विविध विभागांमध्ये कुशल अभियंत्यांची कमतरता जाणवत असून विशेषतः पीपीपी तत्त्वावर विकसित होणाऱ्या प्रकल्पांसाठी बांधकाम विभागात तांत्रिक कौशल्य असलेल्या अभियंत्यांची गरज आहे. त्यामुळे सध्या रिक्त असलेल्या जागा करार पद्धतीने किंवा सरळ सेवा भरतीद्वारे भरण्यात येणार आहेत.

प्रत्येक खात्याने आपल्या विभागातील रिक्त पदांचा फेरआढावा घेऊन आवश्यकतेनुसार भरतीसाठी एकत्रित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही देण्यात आल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.

“एसटीच्या सक्षमीकरणासाठी केवळ बस नव्हे, तर कुशल व तांत्रिक मनुष्यबळाचीही तितकीच गरज आहे. यासाठी आगामी काळात भरती प्रक्रिया वेगाने राबवली जाईल,” असे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

error: Content is protected !!