Homeताज्या बातम्याकांद्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच; महाविकास आघाडीचा महामोर्चा

कांद्याला न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरूच; महाविकास आघाडीचा महामोर्चा

पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको; तीन हजार रुपये हमीभावाची मागणी

पुणे : अजय मगरे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा, कांद्याला प्रतिक्विंटल तीन हजार रुपये हमीभाव द्यावा तसेच कमी दरात विक्री झालेल्या कांद्यासाठी अनुदान जाहीर करावे, या मागण्यांसाठी महाविकास आघाडीच्या वतीने मंगळवारी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात विराट क्रांती महामोर्चा काढत पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

आंदोलनादरम्यान काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर टीका करत कांदा उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडल्याचे सांगितले. “शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने पिकविलेल्या कांद्याला बाजारात कवडीमोल दर मिळत आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. कांद्याला तीन हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव मिळेपर्यंत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेपर्यंत काँग्रेस व महाविकास आघाडीचा संघर्ष सुरू राहील,” असे त्यांनी स्पष्ट केले.

या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, खासदार निलेश लंके, आमदार बापूसाहेब पठारे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार बाबाजी काळे, माजी आमदार अशोक पवार, पुणे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

सपकाळ यांनी सरकारच्या कांदा खरेदी धोरणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासकीय खरेदीची घोषणा करूनही प्रत्यक्ष खरेदी प्रक्रिया सुरू झालेली नसल्याचा आरोप करत कांद्याची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समित्यांमार्फत करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देत त्यांना योग्य हमीभाव मिळवून देण्यासाठी महाविकास आघाडी रस्त्यावर उतरल्याचे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात सरकारविरोधात तीव्र नाराजी असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!