Homeताज्या बातम्याकोपरगांव महामार्गावरील गटार नाल्यामुळे शेती संकटात; शेतकरी आक्रमक.

कोपरगांव महामार्गावरील गटार नाल्यामुळे शेती संकटात; शेतकरी आक्रमक.

कोपरगाव, दि.२९ : दिलीप गायकवाड

कोपरगाव येथील नगर-मनमाड महामार्गालगत दोन्ही बाजूंनी बांधण्यात आलेल्या गटार नाल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गटाराच्या प्रवाहाची योग्य दिशा न ठेवल्यामुळे घाण पाणी थेट शेजारील शेतात शिरत असून, हा “सरकारचा शेतकऱ्यांविरोधातील डाव” असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते आनंदराव भाबड यांनी केला आहे.

भाबड म्हणाले की, कोकमठाण व जेऊर कुंभारी गावातील पावसाचे पाणी पूर्वी जुन्या गंगा नदीमार्गे वाहून जात होते. मात्र, नव्याने बांधण्यात आलेल्या नाल्यामुळे हे पाणी आता महामार्गालगत पुणतांबा फाट्यावर अडवले जात असून, तेथून थेट शेतात शिरत आहे. परिणामी शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, गटाराचे पाणी जुन्या गंगा नदीकडे वळवले जावे, यासाठी शासनाने ठेकेदार, सल्लागार व संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. मात्र, प्रकाश गायकवाड (सल्लागार), मॅनेजर रुपनर, जमाले आदी अधिकाऱ्यांकडे ही बाब निदर्शनास आणून दिली असताना, त्यांनी यावर सकारात्मक भूमिका घेतल्याचे दिसून आलेले नाही.

याशिवाय महामार्ग रुंदीकरणामध्ये माझी संपुर्ण विहर जात असून त्याचा अद्याप मोबदला मिळालेला नाही, याकडेही भाबड यांनी लक्ष वेधले. नैसर्गिक नाले आणि पाण्याच्या वाहत्या वाटा बंद झाल्यामुळे शेती पाण्यात बुडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

“सरकारने केवळ कार्यालयात बसून कागदावर रेषा न ओढता, प्रत्यक्ष मैदानात येऊन परिस्थितीचा आढावा घ्यावा. अन्यथा आम्ही शेतकरी रस्त्यावर उतरण्यास भाग पडू,” असा इशाराही शेतकरी वर्गाने दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंबिका नगरच्या राजाचे थाटामाटात वाजत-गाजत आगमन!

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने गणरायाचे जल्लोषात स्वागत ठाणे, दि.९.( अजय मगरे) ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरातील अंबिका नगर येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीने ‘अंबिका नगरच्या राजा’चे थाटामाटात...

लोकमान्य नगरातील अनधिकृत रिक्षा पार्किंग व आठवडी बाजारावर कारवाईची मागणी

एमएमआरडीएच्या राखीव भूखंडावरील वापराबाबत पँथर ,पत्रकार साईनाथ खरात यांची प्रभाग समितीकडे लेखी तक्रार; कारवाई न झाल्यास उपोषणाचा इशारा   ठाणे, दि.9.( अजय मगरे)   ठाणे | ठाणे महानगरपालिका...

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

error: Content is protected !!