Homeताज्या बातम्याखासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक – मुख्यमंत्री देवेंद्र...

खासगी व धर्मादाय रुग्णालयांना शासकीय आरोग्य योजना राबविणे बंधनकारक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई,दि.२४.( अजय मगरे )

राज्यातील सर्व खासगी व धर्मादाय रुग्णालयांनी केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे बंधनकारक असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत स्पष्ट केले. आमदार भिमराव तापकीर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासनाने धर्मादाय रुग्णालयांची ‘सवलतीची व्याख्या’ नव्याने निश्चित केली असून त्यानुसार अनेक रुग्णालयांचा धर्मादाय श्रेणीत समावेश होतो. या रुग्णालयांनी गरीब व गरजू रुग्णांसाठी राखीव खाटा आणि निधीबाबत संपूर्ण पारदर्शकता ठेवणे आवश्यक आहे.

रुग्णालयांमधील उपलब्ध खाटा, त्यावरील खर्च आणि धर्मादाय निधीचा वापर याची अचूक माहिती मिळावी यासाठी शासनाने डायनॅमिक डॅशबोर्ड विकसित केला आहे. या माध्यमातून प्रत्येक रुग्णालयातील बेडची संख्या, त्यावरील खर्च आणि निधीचा उपयोग कोणत्याही वेळी पाहता येणार आहे. पूर्वी रुग्णालये केवळ खर्च दाखवत असत; मात्र प्रत्यक्ष सेवा दिली जाते की नाही, याची खात्री नव्हती. आता शासनाने निश्चित दर वाढवून दिले असून त्यानुसारच सेवा देणे रुग्णालयांना बंधनकारक राहील.

प्रत्येक रुग्णालयाने आपल्या बेडचे दर सार्वजनिकरित्या जाहीर करणे अनिवार्य असेल. तसेच एकूण निधीपैकी २ टक्के रक्कम धर्मादाय सेवेसाठी वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे. या निधीचा अचूक वापर दिसून यावा यासाठी कायद्यात दुरुस्ती प्रस्तावित असून हा २ टक्के निधी डॅशबोर्डवर स्पष्टपणे दिसेल. कोणत्या रुग्णावर किती खर्च झाला, याचीही माहिती उपलब्ध होईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

या संदर्भातील काही मुद्दे उच्च न्यायालयात प्रलंबित असून न्यायालयाने विधी व न्याय विभागाला रुग्णालयांची बाजू ऐकून निर्णय घेण्याचे निर्देश दिले आहेत. शासनाची भूमिका स्पष्ट असून सर्व धर्मादाय रुग्णालयांनी शासकीय आरोग्य योजना, राखीव खाटा व निधीची अंमलबजावणी पारदर्शकपणे करावी, असेही त्यांनी नमूद केले.

पहिल्यांदाच राज्य शासनाकडे प्रत्येक रुग्णालयाच्या बेडची अद्ययावत माहिती उपलब्ध झाली असून पुढील दुरुस्तीनंतर ही प्रणाली अधिक सक्षम व पारदर्शक होईल, असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

या चर्चेत राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, सदस्य विजय वड्डेटीवार, आमिन पटेल आणि प्रशांत बंब यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!