ठाणे, दि.८. प्रतिनिधी
बहुजन शक्ती सामाजिक संस्था आणि प्रज्ञा फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वागळे इस्टेट येथील अंबिका नगरमधील प्रज्ञा फाऊंडेशन कार्यालयात आयोजित या कार्यक्रमात महिलांचा सत्कार करून त्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी महिलांच्या सक्षमीकरणाबाबत शिवसेना नेते सुखदेव उबाळे यांनी मार्गदर्शन केले. तर समाजातील महिलांचे योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांना शिक्षण, स्वावलंबन आणि नेतृत्वाच्या संधी उपलब्ध करून देणे ही काळाची गरज असल्याचे बहुजन शक्तीचे कार्याध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी आपल्या मनोगतात सांगितले. उपस्थितांनी महिलांच्या सन्मान व अधिकारांसाठी एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्पही व्यक्त केला.
यावेळी छायाताई बचुटे, संध्या डोंगरे, पार्वती जाधव, आशा जाधव, संध्या मोरे, श्वेता ढोकणे, सत्यभामा शिंदे, शोभाताई झिने, सरस्वती मोरे,
यशोदा बरकडे, फुलाबाई मोरे आणि गोधाआई मगरे यांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रज्ञा फाऊंडेशनचे अध्यक्ष तुळशीराम मगरे, बाबासाहेब साबळे, काँग्रेस नेते विजय जाधव, पत्रकार चंद्रकांत जोर्वेकर, विजय हलवाई, बहुजन शक्तीचे विशाल कांबळे,सिद्धार्थ मोरे, शुभम वारे, सुशांत शरणांगत, बौद्धचार्य सुशांत साबळे- अनिकेत मोरे, अंकुश पोटफोडे, सुरज मगरे, विक्रम मगरे, यांच्यासह बहुजन शक्ती सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




















