Homeताज्या बातम्यावागळे इस्टेट पोलिस ठाण्यात महिला अधिकारीच नाहीत; महिला तक्रारींच्या हाताळणीचा प्रश्न निर्माण

वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात महिला अधिकारीच नाहीत; महिला तक्रारींच्या हाताळणीचा प्रश्न निर्माण

ठाणे : प्रतिनिधी

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सरकार विविध योजना राबविते. मात्र ठाण्यातील वागळे इस्टेट पोलिस ठाण्यात एकही महिला अधिकारी नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे महिला तक्रारींच्या हाताळणीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.

जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर सरकार, संघटनांकडून विविध कार्यक्रम घेण्यात येतात. मात्र याच दिवसाच्या पूर्वसंध्येला ठाणे शहरातील वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात  महिला अधिकारी नसल्याचे प्रकरण समोर आले आहे. या पोलीस ठाण्यात महिला पोलिस कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र अधिकारी पदावर एकही महिला नाही. त्यामुळे महिलांशी संबंधित गंभीर तक्रारी किंवा चौकशीच्या वेळी महिला अधिकाऱ्यांचा अभाव जाणवत असल्याचे बोलले जात आहे.

महिलांवरील अत्याचार, छेडछाड, कौटुंबिक हिंसाचार किंवा इतर संवेदनशील तक्रारींसाठी महिला अधिकाऱ्यांची उपस्थिती महत्त्वाची मानली जाते. मात्र अशा परिस्थितीत तक्रार देण्यासाठी येणाऱ्या महिलांना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विशेष म्हणजे हे पोलिस ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात येते. राज्य सरकारकडून महिलांसाठी ‘लाडकी बहिण’ सारख्या योजना राबविल्या जात असताना पोलिस यंत्रणेतच महिला अधिकाऱ्यांची कमतरता असल्याचे चित्र समोर येत आहे.

दरम्यान, याबाबत वागळे इस्टेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिवाजी गवारे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, “आमच्या पोलिस ठाण्यात सध्या महिला अधिकारी नाहीत. मात्र महिला पोलिस कर्मचारी आहेत. एखाद्या प्रकरणात महिला अधिकाऱ्यांची गरज भासल्यास शेजारच्या पोलिस ठाण्यातील महिला अधिकाऱ्यांची मदत घेतली जाते.”

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पत्रकारांच्या एसटी सवलतीचा तिढा सुटणार!

पत्रकारांच्या एसटी सवलतीबाबत सिस्टीममध्ये तातडीने दुरुस्ती होणार अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या तक्रारीची परिवहन मंत्र्यांकडून दखल; सवलत पूर्ववत करण्याचे आदेश मुंबई, ३.(प्रतिनिधी) अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एसटीच्या बसमधून मिळणारी...

बीड-पुणे रेल्वेला १७ सप्टेंबरचा मुहूर्त; डिसेंबरमध्ये मुंबईशीही जोडणी!

कालबद्ध आराखडा तयार करून कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे निर्देश   मुंबई : अजय मगरे   मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधून १७ सप्टेंबर रोजी...

मराठवाड्यावर दुष्काळाचे सावट; कृत्रिम पावसाचा प्रयोग राबवा!

माजी आमदार धिरज देशमुख यांची राज्य सरकारकडे तातडीची मागणी ठाणे : अजय मगरे पावसाळ्याचे तीन महिने उलटूनही मराठवाड्यात समाधानकारक पाऊस न झाल्याने दुष्काळाचे सावट अधिक गडद...

पुण्यातील ४,४६२ घरांसाठी म्हाडाची सोडत; ऑनलाइन अर्जाला सुरुवात

मुंबई : अजय मगरे पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील घरांच्या प्रतीक्षेत असलेल्या नागरिकांसाठी म्हाडाने मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे विविध गृहनिर्माण योजनांतील ४,४६२...

नांदर; येथील अभय राजेभोसले यांची युथ काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदी निवड,

दावरवाडी ता १९(अभिजीत सोनवणे) पैठण तालुक्यातील नांदर ता पैठण येथील अभय प्रतापराव राजेभोसले वय(२४) यांची नॅशनल स्टुडंट्स ऑफ इंडिया काँग्रेसच्या पैठण तालुकाअध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात...

error: Content is protected !!